जिल्हाधिकाऱ्यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 00:57 IST2016-07-03T00:57:58+5:302016-07-03T00:57:58+5:30

जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी तळोधी (बा) परीसरात पूर्व नियोजित दौरा नसताना....

Visit to the District Collector's Primary Health Center | जिल्हाधिकाऱ्यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

जिल्हाधिकाऱ्यांची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

तळोधी (बा) : जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी तळोधी (बा) परीसरात पूर्व नियोजित दौरा नसताना परिसरातील काही विशिष्ठ ठिकाणी भेट देवून समस्यांची माहिती जाणून घेतली.
आज शनिवारी सकाळी तळोधी (बा) येथील वखार महामंडळाला भेट देवून जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी अन्न-धान्याची पाहणी केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तळोधी (बा) येथील दवाखान्याला भेट देवून रुग्णांच्या भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.
त्याचप्रमाणे दवाखान्यातील सर्व रुग्णांची तपासणी करण्यात आली व तळोधी (बा) येथील डॉक्टरांकडून सर्व माहितीची विचारपूस करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्यासोबत ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे, तहसीलदार समीर माने, संवर्ग विकास अधिकारी विरमलवार, वैद्यकीय अधिकारी जीवने, पेंदाम, उईके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. (वार्ताहर)

Web Title: Visit to the District Collector's Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.