झाडे सुतार समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:31 IST2021-03-01T04:31:20+5:302021-03-01T04:31:20+5:30

जयंतीचा प्रारंभ अनुराधा व श्याम झिलपे, जया व सुधाकर माणूसमारे, कमल व नामदेव राजूरकर, आनंदराव दुधलकर यांच्या हस्ते विश्वकर्मा ...

Vishwakarma Jayanti on behalf of Zade Sutar Samaj | झाडे सुतार समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती

झाडे सुतार समाजाच्या वतीने विश्वकर्मा जयंती

जयंतीचा प्रारंभ अनुराधा व श्याम झिलपे, जया व सुधाकर माणूसमारे, कमल व नामदेव राजूरकर, आनंदराव दुधलकर यांच्या हस्ते विश्वकर्मा पूजनाने झाला. विवेक झोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या रक्तदान शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले. न.प.चे सभापती अरुण वाघमारे, युवा उद्योजक संतोष राखुंडे व बबन माणूसमारे या मान्यवरांचा समाज संस्थेचे अध्यक्ष प्रा. मनीष कायरकर, ईश्वर निमसटकर, प्रा. गुलाब कायरकर, श्याम झिलपे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वक्त्यांनी विश्वकर्माविषयी माहिती देत समाज, संघटना सबळ करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जयेंद्र वांढरे यांनी केले. नामदेव शास्रकार, प्रकाश नवघरे, श्यामसुंदर निमसटकर, विठ्ठल दांडेकर, विलास निवलकर, अजय साखरकर, सुनील भटारकर, शंकर निवलकर, अनिल दालवनकर, कैलास राजूरकर, शंकर वांढरे, मोरेश्वर भटारकर, शेषराव अंड्रस्कर आदी समाजबांधवांची उपस्थिती होती.

Web Title: Vishwakarma Jayanti on behalf of Zade Sutar Samaj