गोवरी : वरुर रोड येथील विशाल मनोहर शेंडे याला राष्ट्रीय सेवा योजनेचा गोंडवाना विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त झाला. याबद्दल माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशाल शेंडे यांचा सत्कार करण्यात आला.
विशाल शेंडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनामार्फत महाविद्यालयात होत असलेल्या प्रत्येक उपक्रम, कार्यक्रमात सहभाग घेतो, तसेच आपल्या स्वगावात युवा मित्रांच्या सहकार्याने वाचनालयाची निर्मिती केली. त्याद्वारे अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध प्रकारची उपक्रम, कार्यक्रम, थोर महापुरुष यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धा आदी उपक्रम राबवित आहे. या कार्याची दखल घेत, विशाल शेंडे याला २०१९-२०चा गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त झाला. गावातील आबाजी धानोरकर, साहिल मडावी, प्रज्वल बोरकर, प्रवीण चौधरी, मयूर जानवे, गौरव हिवरे, करण उरकुडे, प्रकाश बोरकुठे यावेळी उपस्थित होते.
Web Title: Vishal Shende felicitated
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.