विशाल शेंडे यांना उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:40+5:302021-01-08T05:35:40+5:30
राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत महाविद्यालयात होत असलेल्या प्रत्येक उपक्रमात, विशेष श्रमसंस्कार शिबिर, राज्यस्तरीय शिबिर, राष्ट्रीय एकता शिबिर तसेच जनजागृती कार्यक्रम, ...

विशाल शेंडे यांना उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार
राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत महाविद्यालयात होत असलेल्या प्रत्येक उपक्रमात, विशेष श्रमसंस्कार शिबिर, राज्यस्तरीय शिबिर, राष्ट्रीय एकता शिबिर तसेच जनजागृती कार्यक्रम, रॅली अशा विविध कार्यक्रमांत त्याने सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत विविध क्षेत्रात जनजागृतीपर कार्यक्रम राबवित उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रासेयो स्वयंसेवकांना राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्याच धर्तीवर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील रासेयो कक्षाद्वारे विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. त्यातून विद्यापीठाचा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कारासाठी विशाल मनोहर शेंडे याची निवड करण्यात आली. १३ जानेवारी २०२१ रोजी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे मान्यवरांच्या हस्ते सकाळी ११.०० वाजता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.