घुग्घुस नगर पालिकेसाठी वीरूगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:39 IST2018-07-14T22:39:01+5:302018-07-14T22:39:23+5:30
घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या माजी सभापतीसह ग्रा. पं. सदस्याने बसस्थानकासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली.

घुग्घुस नगर पालिकेसाठी वीरूगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घूस : घुग्घूसला नगर परिषदेचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या माजी सभापतीसह ग्रा. पं. सदस्याने बसस्थानकासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी केली.
टाकीवर चढलेल्या माजी प७.स सभापती रोशन पचारे, ग्रा. पं. सदस्य पवन आगदारी यांना पोलिसांनी अवघ्या एक तासात खाली उतरवून अटक केली. घुग्घूसची लोकसंख्या व नगर परिषदेच्या निर्मितीसाठी आवश्यक लोकसंख्येचे निकष पूर्ण असूनही मागील अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यापासून वंचित ठेवले जात आहे.
नगर परिषदेच्या मागणीकरिता यापूर्वी घुग्घूस नगर परिषद संघर्ष समितीने घुग्घुस बंद, रस्ता रोको, उपोषण, भिक मांगो आंदोलन व मोबाईल टा@वरवर चढून इबादुल सिद्दीकी यांनी वीरूगिरी करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी रोशन पचारे व पवन आगदारी हे घोषणाबाजी करीत बसस्थानकासमोरील पाण्याच्या टाकीवर चढले. गावकऱ्यांनीही तिकडे धाव घेतली. ठाणेदार सत्यजित आमले घटनास्थळी तत्काळ पोलीस पाठवून दोघांनाही ताब्यात घेतले.