वरोरा पालिकेला मिळणार कोट्यवधीचा निधी

By Admin | Updated: April 25, 2016 00:44 IST2016-04-25T00:44:05+5:302016-04-25T00:44:05+5:30

येथील नगर पालिकेअंतर्गत शहरात अनेक कामे सुरु आहेत. मात्र या कामांना निधी अपुरा पडत आहे.

Virora Municipal Corporation will get billions of funds | वरोरा पालिकेला मिळणार कोट्यवधीचा निधी

वरोरा पालिकेला मिळणार कोट्यवधीचा निधी

अनेक कामे होतील पूर्ण : जिल्हाधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची चर्चा
वरोरा : येथील नगर पालिकेअंतर्गत शहरात अनेक कामे सुरु आहेत. मात्र या कामांना निधी अपुरा पडत आहे. त्या कामांना निधी मिळावा याकरिता वरोरा पालिकेच्या शिष्टमंडळाने आ. बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत पालिकेच्या प्रशासकीय कामांना त्वरित निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
वरोरा पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत करण्यात येत आहे. कामाची प्रशासकीय किंमत ३ कोटी १८ लाख आहे. शासनाकडून १ कोटी ७० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. इमारतीचे बांधकाम ५० टक्के पूर्ण झाले असल्याने इमारत बांधकाम पूर्ण करण्याकरिता उर्वरित निधी उपलब्ध करुन देण्यात यावे, पालिकेच्या वतीने प्रभाग ३ मधील जागेवर आठवडी बाजार भरत असते, मात्र येथे पुरेशा सोयी उपलब्ध नाही. त्यामुळे दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत याठिकाणी काँक्रीट रस्ते, पेव्हींग ब्लॉक फ्लोरिंग, आरसीसी ड्रेन आदी कामे करायची असल्याने कामाच्या प्रारुप नकाशास नगररचनाकार चंद्रपूर यांच्याकडून मंजुरी प्राप्त झाली आहे.
या कामाकरिता १ कोटी ५० लक्ष रुपये अपेक्षित असल्याने तो मंजूर करण्यात यावा, शहरातील कासम पंजा नाला न.प. वस्तीपर्यंत आरसीसी बांधकाम करायचे असल्याने नाल्याच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबतच चर्चा करण्यात आली.
यावेळी आ. बाळू धानोरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, नगराध्यक्षा जनाबाई पिंपळशेंडे, भद्रावती पालिकेचे उपाध्यक्ष प्रफुल चटकी, पाणीपुरवठा सभापती पुरुषोत्तम खिरटकर, नगरसेवक राजू महाजन, अशोक निगम आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Virora Municipal Corporation will get billions of funds