कोरपनातील बँकेत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:00:31+5:30

लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार बंद आहे. या पार्श्वभूमीवर जनधन खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच निराधार योजनेचेही मानधन जमा करण्यात आले आहे. ही रक्कम वटविण्यासाठी बँकेत मोठी गर्दी होत आहे. त्यासोबतच दैनंदिन व्यवहार करणारे ग्राहकसुद्धा बँकेत असतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असते. बँकापुढे खातेदारांना उभे राहण्यासाठी पेंडाल टाकण्यात आले आहे. मात्र हा पेंडाल अपुरा पडत असल्याने खातेदारांना उन्हातान्हात ताटकळत राहावे लागत आहे.

Violation of social distance in Korpana bank | कोरपनातील बँकेत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

कोरपनातील बँकेत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

ठळक मुद्देरस्त्यावर लांबच लांब रांगा : संबंधित विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : येथील जिल्हा मध्यवर्ती बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँकसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. मात्र याकडे बँक व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचा रोजगार बंद आहे. या पार्श्वभूमीवर जनधन खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच निराधार योजनेचेही मानधन जमा करण्यात आले आहे. ही रक्कम वटविण्यासाठी बँकेत मोठी गर्दी होत आहे. त्यासोबतच दैनंदिन व्यवहार करणारे ग्राहकसुद्धा बँकेत असतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असते. बँकापुढे खातेदारांना उभे राहण्यासाठी पेंडाल टाकण्यात आले आहे. मात्र हा पेंडाल अपुरा पडत असल्याने खातेदारांना उन्हातान्हात ताटकळत राहावे लागत आहे.
सदर बँकेसमोर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने वयोवृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बँकेच्या समोर दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात लावली जात असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. बँकेतमध्ये येणारे ग्राहक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

जिवती सीडीसीसी बँकेसमोर रांगच रांग
पाटण : जिवती येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर दररोज ग्राहकांची मोठी रांग लागत असते. प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी एक मिटरच्या अंतरावर उभे राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र ग्राहकांकडून यांचे उल्लंघन होतांना दिसून येत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Violation of social distance in Korpana bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.