सामूहिक प्रयत्नांतूनच गावे होतील समृद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:58 IST2019-01-16T22:57:49+5:302019-01-16T22:58:04+5:30
भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामविकास ही राष्ट्र विकासाची गुरूकिल्ली असून गावांचा विकास झाला तरच देश समृद्ध आणि सर्व घटकांतील जनतेचा विकास होईल, यासाठी मतभेद विसरून ग्रामपंचायतींनी अहर्निश काम करावे.

सामूहिक प्रयत्नांतूनच गावे होतील समृद्ध
भारत हा कृषिप्रधान देश आहे. ग्रामविकास ही राष्ट्र विकासाची गुरूकिल्ली असून गावांचा विकास झाला तरच देश समृद्ध आणि सर्व घटकांतील जनतेचा विकास होईल, यासाठी मतभेद विसरून ग्रामपंचायतींनी अहर्निश काम करावे. यातून जिल्ह्यातील गावे समृद्ध होतील, असे मत जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) ओमप्रकाश यादव यांनी मकरसंक्रांतिनिमित्त ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. ग्रामोन्नती हा स्वराज्य संस्थांचा केंद्र्रबिंदू आहे. ग्रामविकासाच्या विविध समस्यांची चर्चा व्हावी व समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविणे आवश्यक आहे. ग्राम सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, याकरिता ग्रामोद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकरी व ग्रामीण माणसांचा विकास झाल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. लोकाभिमुख ग्राम प्रशासनासाठी ग्रा. पं. भवन, जुन्या भवनाचे विस्तारीकरण, अंतर्गत व गावाला जोडणारे रस्ते निर्माण केली जात आहेत. दुर्बलांना कौशल्य विकास प्रशिक्षण, दलित वस्तींचा विकास आदी कामांना गती मिळावी, याकरिता ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य केल्यास देश जोडण्याची गती पुन्हा वाढेल, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी सांगितले.
अनुदानीत कृषी अवजारे, शेतीशाळा, मार्गदर्शन, सिंचन सुविधा, आदर्श अंगणवाडी, बालस्नेही शिक्षणपद्धती, पिण्याचे पाणी, डिजिटल शाळा, आनंदी शिक्षण पद्धती रूजविण्यासाठी विरोधी नव्हे तर विकासाभिमुख दृष्टीची गरज असल्याचे यादव यांनी नमूद केले