ग्रामस्थांनी दिली हागणदारीमुक्तीची हमी

By Admin | Updated: December 9, 2014 22:48 IST2014-12-09T22:48:37+5:302014-12-09T22:48:37+5:30

स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर, राजुरा, जिवती तसेच कोरपना तालुक्यातील काही गावांना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी भेटी दिल्या.

The villagers have given assurance of humiliation | ग्रामस्थांनी दिली हागणदारीमुक्तीची हमी

ग्रामस्थांनी दिली हागणदारीमुक्तीची हमी

चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर, राजुरा, जिवती तसेच कोरपना तालुक्यातील काही गावांना जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांनी भेटी दिल्या. या भेटीमध्ये त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी गाव हागणदारीमुक्त करण्याची हमी अध्यक्ष तथा सिईओंना दिली आहे.
उघड्यावर शौचास जाणे ही माणसाला शोभणारी बाब नसून, गावात वाढणारी अस्वच्छता ही आपले आरोग्य बिघडविण्याचे काम करते. त्यामुळे आपले आरोग्य सुरक्षित राखण्याकरिता शौचालय बांधा व त्याचा नियमित वापर करा, असा संदेश जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी गृहभेटी दरम्यान लाभार्थ्यांना दिला. गावस्तरावर अधिकाधिक स्वच्छतेची व्याप्ती वाढावी व गाव पूर्णत: स्वच्छ व १०० टक्के हागणदारीमुक्त व्हावे याकरिता जिल्ह्यातील गावात जावून प्रत्यक्ष गृहभेट देऊन गावकऱ्यांना शौचालयाच महत्त्व पटवून सांगण्याचा प्रयत्न सुरु आहे. या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, चुनाभट्टी, बामणी, काटवल या गावांना भेटी देवून गावकऱ्यांशी प्रत्यक्ष घरी जावून चर्चा केली जात आहे. चर्चेदरम्यान गावकऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी समजून प्रत्येक लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम व नियमित वापराकरिता विनंती करण्यात येत आहे. या उपक्रमाला गावकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावकरी स्वत:हून शौचालय बांधकामाकरिता पुढाकार घेत आहे. अनेक गावातील गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याची हमी दिली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील गावभेटी दरम्यान जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, पंचायत समिती उपसभापती अनेकश्वर मेश्राम, पंचायत समिती सदस्य सुमन लोहे, गटविकास अधिकारी गजभे, विसापूरचे सरपंच बंडू गिरडकर, काटवलचे सरपंच माधुरी ढोमणे, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय धोटे, मनुष्य बळ विकास सल्लागार बंडू हिरवे, गट समन्वयक सुवर्णा जोशी, सुनील नुत्तलवार यावेळी उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी कोरपना तालुक्यातील काही गावांत भेटी देण्यात आल्या. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The villagers have given assurance of humiliation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.