गावातील ग्रामसभाच सर्वोच्च
By Admin | Updated: November 1, 2016 00:52 IST2016-11-01T00:52:01+5:302016-11-01T00:52:01+5:30
गाव हाच विश्वाचा नकाशा आहे. गावातील निर्णय गावात घेण्याची गरज निर्माण झाली असून...

गावातील ग्रामसभाच सर्वोच्च
देवाजी तोफा यांचे प्रतिपादन : बिबी येथे ‘दिव्यग्राम-२०१६’चे आयोजन
कोरपना : गाव हाच विश्वाचा नकाशा आहे. गावातील निर्णय गावात घेण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी ग्रामसभा हे महत्त्वाचे साधन आहे.त्यामुळे गावातील ग्रामसभाच सर्वोच्च असल्याचे प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा येथील प्रसिद्ध समाजसेवक देवाजी तोफा यांनी व्यक्त केले.
समाजसेवक डॉ. गिरीधर काळे सामाजिक संस्था बिबीच्या वतीने गावात ‘दिव्यग्राम-२०१६’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. लेखामेंढा हा वनहक्क मिळवलेला देशातील एकमेव गाव आहे. त्यासाठी केलेल्या प्रयत्नाची त्यांनी बिबी गावकऱ्यांना आठवण करून दिली.
माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्य श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला व शहिदांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुण कुलकर्णी होते. उद्घाटन माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष म्हणून समाजसेवक डॉ. गिरीधर काळे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक हरीश ससनकर, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, डॉ. श्रीनाथ कुलकर्णी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर आस्वले, पोलीस पाटील राहुल आसुटकर, चिंचोलकर, माजी सरपंच चंद्रकांत झुरमुरे, मुख्याध्यापिका साधना वाढई, ग्रामविकास अधिकारी अरुण वाकुडकर, संस्थेचे सचिव देविदास काळे, वासुदेव बेसुरवार, उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार अॅड. वामनराव चटप, समाजसेवक डॉ. गिरीधर काळे व कवी अविनाश पोईनकर यांचा ग्रामपंचायत बिबीच्या वतीने उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी केले. संचालन व आभार अविनाश पोईनकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचा सत्कार
विद्यार्थ्यांसाठी सकाळी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. स्पर्धेत क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सेवार्थ गृप, साई स्पोर्र्टीग क्लब, सेव्हन स्टार स्पोर्र्टीग क्लब, जय शिवशंकर स्पोर्र्टीग क्लब, श्री. गुरुदेव सेवा मंडळ, हनुमान मंदिर समिती, शिवराजे क्रीडा मंडळ, नुरानी संदल कमेटी, श्री. गुरुदेव भारुड मंडळ, नवचैतन्य भारुड मंडळ, क्रांतीज्योत युवा मंडळ, जागृत मंडळ, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व पुतळा समिती, सर्व महिला व पुरुष बचत गट तसेच ग्रामपंचायत बिबीचे सहकार्य लाभले.