कोर्टी मक्ता येथे ग्राम स्वच्छता अभियान

By Admin | Updated: June 10, 2015 01:44 IST2015-06-10T01:44:35+5:302015-06-10T01:44:35+5:30

लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूर, सेव्ह अ फॅमिली प्लॉन इंडिया, ...

Village Sanitation Campaign at Kotti Makta | कोर्टी मक्ता येथे ग्राम स्वच्छता अभियान

कोर्टी मक्ता येथे ग्राम स्वच्छता अभियान

चंद्रपूर : लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूर, सेव्ह अ फॅमिली प्लॉन इंडिया, सीडी स्पेड- ३ प्रकल्पांतर्गत कोर्टी मक्ता (जुनी) येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रम मा. फा. जोबिन ओवेलील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी, गावकरी, युवक-युवती, महिला मंडळ व विद्यार्थी यांची सकाळी ९ वाजता स्वच्छता रॅली काढून गावातील रस्ते साफ करण्यात आले. त्यानंतर रॅलीचे समारोप करुन सभेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच दिलीप कवडू सोयाम, आशा वर्कर सुजाता नगराळे, अंगणवाडी सेविका शोभा टोंगे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष आबाजी सोयाम, पोलीस पाटील सुशिला कोडापे, ग्रा.पं. सदस्य चंदा गेडाम, वनरक्षक वांढरे, ग्रामसेवक ए. यू. मेश्राम, अर्जुन अलगमकर, प्रकल्प समन्वयक भास्कर ठाकूर, पाणलोट प्रकल्प समन्वयक संदीप नळे, सहायक समन्वयक प्रवीण चंदनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नागरिकांत जनजागृती करून स्वच्छतेबाबत गावकऱ्यांना महत्त्व पटवून देण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Village Sanitation Campaign at Kotti Makta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.