गावातील पदाधिकाऱ्यांचा ग्रामपंचायत कोविड योद्धा म्हणून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST2021-04-12T04:25:55+5:302021-04-12T04:25:55+5:30
सावरगाव : नागभीड तालुक्यातील येनोली माल ग्रामपंचायततर्फे गटग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या येनोली माल, धामणगाव चक, धामणगाव माल गावांतील सर्व पदाधिकाऱ्यांचा मागील ...

गावातील पदाधिकाऱ्यांचा ग्रामपंचायत कोविड योद्धा म्हणून सन्मान
सावरगाव : नागभीड तालुक्यातील येनोली माल ग्रामपंचायततर्फे गटग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या येनोली माल, धामणगाव चक, धामणगाव माल गावांतील सर्व पदाधिकाऱ्यांचा मागील वर्षीच्या कोरोनाकाळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
मागील वर्षी कोविड-१९ अंतर्गत कोरोना पादुर्भावाच्या काळात येनोली माल गटग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या येनोली माल, धामणगाव चक, धामणगाव माल या गावांतील शासकीय, निमशासकीय आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी सामाजिक भान व समाजाप्रती असलेली बांधीलकी जपत जबाबदारी व कार्यतत्परतेने केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय होते. त्या कोरोनाकाळात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करणे, संबंधित विभागाला माहिती पाठविणे, खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, गावात सर्व्हे करणे, गावात औषधाची फवारणी करणे आदी कार्य चोखपणे बजावले. या सर्व कार्याची दखल घेत येनोली माल गटग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर्मचारी आनंद सोनवाणे, रामदास बोरकर, अंगणवाडी सेविका इंदूबाई सोनवाणे, मीना बोरकर, नंदा थेरकर, चंद्रभागा जनबंधू, अंगणवाडी मदतनीस अमृतकन्या मसराम, नलिना आत्राम, माया दुबे, विश्वज्योती खोब्रागडे, आशासेविका संध्या मडावी, सानिया कापगते, पंचशीला पाटील, पोलीस पाटील नानाजी भाकरे, शंकर दडमल, तुळशीराम शेंडे तथा संगणक परिचालक विजय सोनवाने या सर्वांचा येनोली येथील लोकनियुक्त सरपंच अमोल बावनकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच अर्चना मेश्राम, ग्रा.पं. सदस्य राजू झोडे, ग्रा.पं. सदस्य संगीता घुगुस्कर, ग्रा.पं. सदस्य वर्षा सोनवाने आदींची उपस्थिती होती.