वन विभागाच्या कार्यालयात ग्रामस्थांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:50 IST2019-05-27T22:49:46+5:302019-05-27T22:50:01+5:30
तालुक्यात सतत वाढत गेलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

वन विभागाच्या कार्यालयात ग्रामस्थांचा ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : तालुक्यात सतत वाढत गेलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसह श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयात सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.
ब्रम्हपुरी तालुक्यात मागील काही महिन्यापासून वाघाचे हल्ले होऊन अनेकांचे बळी गेले आहेत. काही जखमी झाले आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी शेतात जाणे म्हणजे दहशतीचे काम झाले आहे.
परिसर भयभीत झाला आहे. यापूर्वी या जंगलातील वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकºयांनी निवेदन सादर केले आहे व त्यासाठी वन विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले आहे. परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने सोमवारी पुन्हा ठिय्या आंदोलन करून घेराव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे आंदोलन सोमवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले. यात तालुक्यातील भुज एकारा, रानपरसोडी, मेंडकी, पवनपार, पदमापूर, हळदा व अन्य गावातून महिला व पुरुष उपस्थित होते. दरम्यान, वृत्त लिहिपर्यंत वनविभागाच्या अधिकाºयांनी याबाबत ठोस आश्वासन दिले नाही.