विजय वड्डेट्टीवार यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

By Admin | Updated: October 11, 2016 00:53 IST2016-10-11T00:53:28+5:302016-10-11T00:53:28+5:30

येथील सामाजिक कार्यकर्ते शाबानभाई शेख यांनी स्वत:च्या निवास्थानी स्वखर्चाने जवळपास २० लक्ष रूपये खर्च करून...

Vijay Vaddettiwar inaugurated the gymnasium | विजय वड्डेट्टीवार यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

विजय वड्डेट्टीवार यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

वरोऱ्यात अत्याधुनिक व्यायामशाळा : शाबानभाई यांचा पुढाकार 
वरोरा : येथील सामाजिक कार्यकर्ते शाबानभाई शेख यांनी स्वत:च्या निवास्थानी स्वखर्चाने जवळपास २० लक्ष रूपये खर्च करून अत्याधुनिक व्यायामशाळा उभारली. विशेष म्हणजे, शहरातील युवकांना यात मोफत प्रवेश राहणार आहे. त्यांच्या या व्यायाम शाळेचे विधानसभेचे उपगटनेता आ. विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
वरोरा शहर हे सामाजिक कार्याकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे गरिबांच्या मुलांना अत्याधुनिक व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याचा शाबानभाई यांनी घेतलेला संकल्प त्यांनी पूर्ण केला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. उद्घाटन कार्यक्रमाला वरोरा काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक शेख छोटूभाई, पंचायत समिती सभापती सुनंदा जिवतोडे, जि. प. माजी सभापती कन्हय्यालाल जयस्वाल, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष आसिफ रजा, माजी न. प. उपाध्यक्ष राजू कातोरे, वरोरा काँग्रेस जेष्ठ नेते वसंत विधाते, सामाजिक कार्यकर्ते हाजी अहतेशाम अली, काशिफ खान उपस्थित होते.
यावेळी आ. विजय वड्डेटीवार यांचा शाल, श्रीफळ देऊन सर्व कार्यकर्त्यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे संचालन जाकीर शेख यांनी तर आभार शकील शेख यांनी मानले. यावेळी वॉर्डातील असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Vijay Vaddettiwar inaugurated the gymnasium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.