शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 - युतीत प्रतिष्ठेची; आघाडीत अस्तिवाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

काँग्रेसचे विद्यमान खासदार सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे वरोरा मतदार संघावर भाजपचा डोळा आहे. परंतु शिवसेनेने काँग्रेसचे जिल्हा बँक अध्यक्षाला शिवबंधन बांधून आपला दावा मजबूत केला आहे. काँग्रेस घराणेशाहीत अडकली आहे. चंद्रपुरात भाजपपुढे दमदार आव्हान उभे करण्याच्या तयारीत काँग्रेस असली तरी अंतर्गत विरोधाची शक्यता आहे.

ठळक मुद्देविधानसभेची रणधुमाळी । सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाची कसोटी

राजेश भोजेकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच पुन्हा विजयाची पताका फडकवणार असे चित्र होते. मात्र काँग्रेसने शिवसेनेचा आमदार हायजॅक करून उमेदवारी दिल्याने भाजपपुढे नव्हे आव्हान उभे झाले. ही तिकिट देताना अनेक नावे पुढे केली गेली. अशातच माजी जिल्हाध्यक्षाला तिकीट जाहीर करताच कार्यकर्त्यांमध्ये सर्वत्र नाराजीचा सूर उमटला आणि दिलेला एबी फार्म परत घेऊन शिवसेनेतून आलेले सुरेश धानोरकर यांना तिकीट दिली. धानोरकरांना मिळालेल्या सहानुभूतीच्या बळावर ही जागा काँग्रेसने जिंकली आणि ती महाराष्ट्रात एकमेव ठरली. देशात सर्वत्र भाजपमय वातावरण निर्माण झाले असताना या एका जागेच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या महत्त्वाकाक्षांना नवी पालवी फुटली. परिणामी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढली. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत कितपत होते हे निकालाअंती कळेलच, परंतु या राजकीय उलथापालथीमुळे विधानसभा निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष बदलाचेही राजकारण सुरू झाले आणि आचारसंहिता लागल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत ते सुरू राहतील, असे चित्र आहे. यामुळे ऐनवेळी कोण कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे जाईल हेही बघायला मिळणार आहे. भाजपमध्येही इच्छुकांची गर्दी झालेली आहे. काही विद्यमान आमदारांना डच्चू देऊन ती जागा आपल्या वाट्याला यावी, या दृष्टीकोनातून इच्छुकांकडून जोरदार हालचाली बघायला मिळत आहे.काँग्रेसचे विद्यमान खासदार सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे वरोरा मतदार संघावर भाजपचा डोळा आहे. परंतु शिवसेनेने काँग्रेसचे जिल्हा बँक अध्यक्षाला शिवबंधन बांधून आपला दावा मजबूत केला आहे. काँग्रेस घराणेशाहीत अडकली आहे. चंद्रपुरात भाजपपुढे दमदार आव्हान उभे करण्याच्या तयारीत काँग्रेस असली तरी अंतर्गत विरोधाची शक्यता आहे. भाजपातही विद्यमान आमदाराबद्दल नाराजीचा सूर आहे. राजुऱ्यात भाजपात चढाओढ बघायला मिळत आहे. काँग्रेस जुनाच चेहरा रिंगणात उतरविण्याच्या तयारीत दिसत आहे. बल्लारपूरात ना. सुधीर मुनगंटीवार यांना शह देणारा चेहरा काँग्रेसला सापडत नाही आहे. ब्रह्मपुरीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजप नव्या चेहऱ्याची चाचपणी करीत आहे. चिमुरात बंटी ऊर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांनी गेल्या पाच वर्षांत या मतदार संघाचा चेहरामोहरा बदलविल्याने भाजप वरचढ दिसत असून बहुजन वंचित आघाडी काँग्रेसची चिंता वाढविण्याची शक्यता आहे.विकास कामांवर विरोधकांची दमछाक करणारपालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी विजयाचा षटकार मारण्याची संधी आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ३० वर्षांपासून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. या काळात त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात भाजप मजबूत केली आणि वाढविली. गेल्या पाच वर्षांत त्यांनी अर्थमंत्री पदाचा चंद्रपूर जिल्ह्यासाठी पूरेपूर लाभ मिळवून दिला. राज्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत त्यांनी सर्वाधिक निधी चंद्रपूर जिल्ह्याला उपलब्ध करून दिला. हा निधी जंगखात पडून न ठेवता अवघ्या पाच वर्षात विकासकामे करून दाखविली. चंद्रपूर जिल्ह्यात या निवडणुकीची धुरा त्यांच्यावर असणार आहे. स्वाभाविकच ते विकास दाखवून मते मागतील. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे विरोधकांची चांगलीच दमछाक होणार असल्याचे त्यांच्यावर होणाऱ्या निम्न दर्जाच्या आरोपावरून दिसून येते.विरोधी पक्ष नेता सत्ताधाऱ्यांवर भारी पडणारविजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली. या अल्पकाळात त्यांनी या पदाला साजेशी भूमिका वटविली. राज्यातील प्रश्नांवर ते आक्रमक होताना दिसले. बेधडक व्यक्तिमत्वाचे धनी असलेले वडेट्टीवार या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात सत्ताधारी पक्षांवर हावी होतील असे चित्र आहे. त्यांच्या ब्रह्मपुरी मतदार संघात भाजपकडे चेहराच नाही. इतर पक्षातून किंवा बाहेर जिल्ह्यातून उमेदवार आयात करण्याच्या हालचाली भाजपात सुरू असल्याचे समजते. परंतु हे चेहरेही त्यांच्यापुढे तग धरतील, असे वाटत नसल्याच्या मतदारांत चर्चा आहे. वडेट्टीवारांचे आव्हान भाजपला सहज पेलेल असे चित्र सध्यातरी जिल्ह्यात दिसत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची धुरा त्यांच्या खांद्यावर असून सत्ताधारी आणि विरोधकांचा कलगीतुरा बघायला मिळणार आहे.राजुरा व चंद्रपुरात काँग्रेसचे आव्हानचंद्रपुरात काँग्रेसकडून महेश मेंढे तयारीत असले तरी काही महिन्यांपूर्वी शिवसेना सोडलेले किशोर जोरगेवार काँग्रेसच्या तिकीटसाठी चांगलीच फिल्डिंग लावून आहे. गेल्या निवडणुुकीतील दुसऱ्या क्रमाकांच्या मतांवर ते तिकीट मागत आहे. राजुºयात काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे हे अत्यल्प मतांनी पराभूत झाले होते. तर स्वभापकडून अ‍ॅड. वामनराव चटप तयारीत आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा