विदर्भस्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धेचा समारोप
By Admin | Updated: March 16, 2016 08:35 IST2016-03-16T08:35:24+5:302016-03-16T08:35:24+5:30
नगर परिषद भद्रावतीतर्फे आयोजित विदर्भस्तरीय नगराध्यक्ष सूवर्ण चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोमवारी पार पडला.

विदर्भस्तरीय नगराध्यक्ष चषक स्पर्धेचा समारोप
व्हॉलीबॉलमध्ये आर्वी पालिका प्रथम : भद्रावती नगर पालिकेचा संघ द्वितीय
भद्रावती : नगर परिषद भद्रावतीतर्फे आयोजित विदर्भस्तरीय नगराध्यक्ष सूवर्ण चषक स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सोमवारी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सचिन कुमावत, ठाणेदार अर्जुन बोगे, उमरेड नपचे डॉ.राकेश तिवारी, नगराध्यक्ष रेवतकर, नगराध्यक्षा पुरोहित, नगराध्यक्ष खेडेकर, मुख्याधिकारी विनोद जाधव, न.प. गटनेता नालंदा पाझारे, सभापती मिनल आत्राम, माया नारळे, शोभा सातपुते, उपसभापती माधुरी कळमकर, सभापती प्रमोद गेडाम, शारदा ठवसे, नगरसेवक सुधीर सातपूते, संजय आसेकर, संदीप बडाळकर, विनोद वानखेडे, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, राजू गैनवार, रेखा कुटेमाटे, सीमा पवार, शुभांगी उमरे, आशा निंबाळकर आदी उपस्थित होते.
व्हॉलीबॉल स्पर्धेचे सूवर्ण चषक नगर परिषद आर्वीच्या संघाने तर दूसरे बक्षीस नगरपरिषद भद्रावती संघाने पटकाविले. तृतीय बक्षीसाचा मानकरी नगर पंचायत धानोराचा संघ ठरला. क्रिकेट स्पर्धेचे सूवर्ण चषक नगर परिषद आर्वी, द्वितीय ब्रह्मपुरी तर तृतीय बक्षीस सिंदी रेल्वे संघाने पटकाविले. कबड्डी स्पर्धेचे सूवर्ण चषक उमरेड संघाने, द्वितीय वरोरा संघाने तर तृतीय पारितोषिक मूल संघाला प्राप्त झाले.
बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम बक्षीस नसरूद्दीन भामाणी, घनश्याम अग्रवार (न.प. कोरची), द्वितीय बक्षीस प्रमोद नागरे व संजय किटे (न.प. आर्वी) तर तृतीय बक्षीस सुनील पवार व येल्लय्या ढासरफ या जोडीने पटकाविले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सचिन सरपटवार, प्रास्ताविक मुख्याधिकारी विनोद जाधव तर आभार प्रफुल चटकी यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)