विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघामुळे शिक्षकांच्या जीवनाला आर्थिक स्थैर्य : डायगव्हाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST2021-09-24T04:33:34+5:302021-09-24T04:33:34+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्याध्यक्ष लक्षमणराव धोबे, प्रमुख मार्गदर्शक सरकार्यवाह सुधाकर अडबाले, प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस नेते तथा माजी कार्यवाह ...

विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघामुळे शिक्षकांच्या जीवनाला आर्थिक स्थैर्य : डायगव्हाणे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कार्याध्यक्ष लक्षमणराव धोबे, प्रमुख मार्गदर्शक सरकार्यवाह सुधाकर अडबाले, प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस नेते तथा माजी कार्यवाह गजानन गावंडे, सहकार्यवाह जगदीश जुनघरी, कार्यवाह श्रीहरी शेंडे, प्राचार्य सूर्यकांत खनके, जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, गडचिरोलीचे कार्यवाह अजय लोंढे, प्राचार्य सी. डी. तन्नीरवार, सिनेट सदस्य सुनील शेरकी, दीपक धोपटे, कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, मंजूषा घाईत, उपप्राचार्य सी. व्ही. टोंगे उपस्थित होते.
व्ही. यू. डायगव्हाणे पुढे म्हणाले १९७२ पासून शिक्षकांचा बँकेतून होणारा पगार, १९८१ची नियमावली, १९८२ची कुटुंब निवृत्तिवेतन योजना, १९७७च्या ५४ दिवसांच्या संपामुळे केंद्राप्रमाणे लागू होणारा महागाई भत्ता, १९९५च्या परीक्षा बहिष्कार आंदोलनामुळे केंद्राप्रमाणे मिळालेला पाचवा व सहावा वेतन आयोग ही सर्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची देण आहे. आज २०२० पासून विमाशि संघाचा प्रतिनिधी राज्याच्या वरिष्ठ सभागृहात नसल्यामुळे जुनी पेन्शन, विनाअनुदानीताचा प्रश्न, अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न उभा राहिला आहे. पुढे अनेक समस्या निर्माण होऊन शिक्षकांच्या नोकरीवर गदा येऊ शकते आणि म्हणून डिसेंबर-२०२२च्या निवडणुकीमध्ये विमाशि संघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना निवडून आणणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही डायगव्हाणे यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी गजानन गावंडे म्हणाले की, आम्ही राजकीय पक्षात काम करत असलो तरी विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघ ही आमची प्राथमिकता आहे. संघाच्या स्थापनेपासून ७५ वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्याला सुधाकर अडबाले यांच्यासारखा शांत, संयमी, कर्तबगार नेता विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाचा अधिकृत उमेदवार म्हणून मिळाला आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील विमाशि संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षकांनी भरभरून साथ दिली पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. प्राचार्य सूर्यकांत खनके यांनी, विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघ ही शिक्षकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करून समस्या सोडविणारी संघटना असून, सर्व मतभेद बाजूला सारून शिक्षकांनी एकसंघ राहून एकजुटीने अडबाले यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. यावेळी सरकार्यवाह सुधाकर अडबाले म्हणाले, महिला शिक्षिकांचा सन्मान करणे ही विदर्भ माध्यमिक शिक्षकसंघाची प्राथमिकता आहे. हिंगणघाटच्या प्राध्यापिकेवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हा बंदची हाक देताच विमाशिच्या कार्यकर्त्यांनी तो बंद यशस्वी करून दाखविला. श्रीहरी शेंडे, जगदिश जुनगरी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी वयोमानानुसार सेवानिवृत्त २५ शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राचार्य, मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर तालुका ग्रामीणचे अध्यक्ष सतीश अवताडे, संचालन उपाध्यक्ष बी. एन. विखार यांनी केले, तर आभार शहर अध्यक्ष जयंत टोंगे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शहर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, ग्रामीण कार्यवाह अनिल देरकर, अहफाज शेख, बंडू वांढरे, विलास खडसे, अशोक वरभे, कमलाकर कोरडे, मनीष कन्नमवार, शरद डांगेल दिवाकर खाडे, सुखदेव हर्षे, प्रशांत कष्टी, सुभाष राजूरकर, प्रवीण आबोजवार, रूपाली मुंगल, प्रमोद पेद्दीलवार, शकील आदींनी सहकार्य केले.