महाराष्ट्रदिनी विदर्भाचा गजर

By Admin | Updated: May 2, 2015 01:10 IST2015-05-02T01:10:10+5:302015-05-02T01:10:10+5:30

राज्यभर महाराष्ट्रदिनाचा समारंभ पार पडला असला तरी, याच दिवसाचे औचित्य साधून चंद्रपुरात मात्र विदर्भवाद्यांनी आंदोलनाने हा दिवस गाजवला.

Vidarbha Alarm | महाराष्ट्रदिनी विदर्भाचा गजर

महाराष्ट्रदिनी विदर्भाचा गजर

चंद्रपूर : राज्यभर महाराष्ट्रदिनाचा समारंभ पार पडला असला तरी, याच दिवसाचे औचित्य साधून चंद्रपुरात मात्र विदर्भवाद्यांनी आंदोलनाने हा दिवस गाजवला. विदर्भ कनेक्ट संघटनेच्या पुढाकारात चंद्रपुरातील जनता महाविद्यालयाच्या मैदानात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत विदर्भाचा ध्वज फडकविण्यात आला. तर, विदर्भ आंदोलन समितीने अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात जटपुरा गेटसमार पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि भूपृष्ठ परिवहन मंत्र्याचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच या दोन्ही कार्यक्रमांची घोषणा विदर्भवाद्यांनी केली होती. संपूर्ण विदर्भातील जिल्हा मुख्यालयात हा उपक्रम पार पडला, त्याअंतर्गत चंद्रपुरातील विदर्भवाद्यांनी एकत्र येऊन आपल्या भावना प्रदर्शित केल्या. (जिल्हा प्रतिनिधी)
विदर्भ कनेक्टच्या पुढाकारात चंद्रपुरातील सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन जनता महाविद्यालयात सकाळी ९ वाजता विदर्भाचा ध्वज फकडविला. विदर्भ कनेक्टचे चंद्रपूर संयोजनक बंडू धोतरे, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे, एफईएस कॉलेजचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय मोगरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय चंदावार, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे डॉ. गोपाल मुंधडा, अ‍ॅड. अभय पाचपोर या सर्वांनी मिळून विदर्भाचा ध्वज फडकविला. ‘जय विदर्भ’ अशा घोषणांनी भारावलेल्या वातावरणात झेंड्याला सलामीही देण्यात आली. त्यानंतर डॉ. अशोक जीवतोडे यांनी विदर्भाची शपथ दिली.
विदर्भाचा ध्वज फडकला

Web Title: Vidarbha Alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.