वनोजा येथे ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:26 IST2021-01-22T04:26:10+5:302021-01-22T04:26:10+5:30
वरोरा : तालुक्यातील वनोजा या गावात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा विजय झाला आहे. या पॅनलमधील सर्व ...

वनोजा येथे ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा विजय
वरोरा : तालुक्यातील वनोजा या गावात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा विजय झाला आहे. या पॅनलमधील सर्व सातपैकी सातही उमेदवार बहुमतांनी विजय झाले असून ४० वर्षानंतर येथील नवयुवकांनी सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे.
या गावामध्ये ४० वर्षांपासून एकाच पॅनलची सत्ता बसत होती. सत्ताधाऱ्यांना उलथून पाडण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. मात्र ते सर्व अयशस्वी झाले. मात्र गावातील युवकांनी एकत्र येत सत्ता परिवर्तन करून दाखविल्याने त्यांच्या या विजयाचे कौतुक गावकऱ्यांकडून केल्या जात आहे.
बॉक्स
विजयी मिरवणुकीऐवजी गावात पसरली शोककळा
वनोजा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागताच गावकऱ्यासह युवकांनी मोठा जल्लोष साजरा केला होता. गावात मिरवणुकीची तयारी सुरू झाली. ठिकठिकाणी विजयाचा गुलाल उधळला जात होता. गावातील मिरवणुकीसाठी विजयी उमेदवारासह येथील युवक तालुक्यातील गावाकडे रवाना होण्यासाठी निघाले. मात्र गाव एकत्रित करून पॅनलला निवडून आणण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पवन चटकी नामक युवकाचा वाटेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आणि संपूर्ण गावात शोककळा पसरली.