भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचा दणदणीत विजय
By Admin | Updated: October 19, 2014 23:52 IST2014-10-19T23:52:32+5:302014-10-19T23:52:32+5:30
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी यांचा ४३ हजार ६०० मतांनी पराभव करुन दणदणीत विजयश्री खेचून आणली.

भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचा दणदणीत विजय
मूल : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी यांचा ४३ हजार ६०० मतांनी पराभव करुन दणदणीत विजयश्री खेचून आणली.
यात भाजपाचे मुनगंटीवार यांना एक लाख तीन हजार ७१८ मते मिळाली, तर काँग्रेसचे मुलचंदानी यांना केवळ ६० हजार ११८ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील बसपाचे राजेश दुर्गासिंग सिंह यांना १० हजार ३४४ मते पडली. भाजपाचे मुनगंटीवार यांनी मूल शहरात विजयी रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे उमेदवार घनश्याम मुलचंदानी यांची भाजपाचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काटयाची लढत होईल, असे मानल्या जात होते. काँग्रेसचे उमेदवार मुलचंदानी यांच्या स्वगृही बल्लारपूर तालुक्यात १० ते ११ हजार मताधीक्य घेतील अशी चर्चा होती मात्र सदर चर्चा केवळ चर्चाच ठरली. सुधीर मुनगंटीवार यांचा या मतदार संघातून विजय झाला.