मारहाणीविरूद्ध तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:33 IST2018-12-12T00:30:57+5:302018-12-12T00:33:32+5:30
डुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक करून मारहाण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिवती शहरात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला. मालगुडा व झांझनेरी येथील सात आरोपींना डुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक वनविभागाने अटक केली होती.

मारहाणीविरूद्ध तहसीलवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : डुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक करून मारहाण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिवती शहरात कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला.
मालगुडा व झांझनेरी येथील सात आरोपींना डुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक वनविभागाने अटक केली होती. त्यापैकी सुदाम पवार, विमल पवार, निवास राठोड या तिघांना बंद खोलीत डांबून मारहाण केल्याची घटना घडली. या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात रामनगर येथील सेवालाल मंदिरापासून झाली. बिरसामुंडा चौकात सभा पार पडली. तहसीलदाराला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील गोरसेनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. अॅड. आमदार संजय धोटे यांनी मोर्चात सहभागी होऊन दोषी वनअधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.