शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ठाण्याच्या आवारातच पीडित महिलेचे विष प्राशन, प्रशासनात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 11:06 IST

आत्महत्येचा इशारा देऊनही पोलिसांचा कानाडोळा

वरोरा (चंद्रपूर) : अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध तक्रार देऊनही अटक न केल्याने, पीडित आदिवासी महिलेने वरोरापोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. ७) दुपारी ४:३०च्या सुमारास घडली. पीडितेला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या प्रकृती स्थिर असल्याचे समजते. आत्महत्येचा इशारा देऊनही पोलिसांनी कानाडोळा करण्याचे कारण काय, असा प्रश्न आता नागरिकांत विचारला जात आहे.

खांबाडा येथील महिलेने २ ऑगस्ट रोजी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार, शेख इरफान याने तिच्यावर अत्याचार केला. शेख इरफान व त्याचा भाऊ शेख रिजवान हे तक्रार परत घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचे तक्रारीत नमूद केले. या प्रकरणाचा तपास वरोरा पोलिस ठाण्याचे एपीआय नीलेश चवरे करीत आहेत. दारूचा अवैध व्यवसाय करणारे आरोपीचे भाऊ शेख रिजवान याच्याशी चवरे यांचे आर्थिक संबंध असल्याने आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोपही महिलेने केला.

आरोपीच्या नातेवाइकांनी खांबाळा येथील एका हॉटेलमध्ये बेदम मारहाण केली. तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी आरोपी शेख रिजवान, शेख मोहसीन, शेख दानिश व शेख मोहम्मद यांना अटक केली नाही. त्यामुळे आरोपींना अटक न झाल्यास ७ ऑगस्ट, २०२३ रोजी विष प्राशन करू, असा इशारा पीडित महिलेने गुरुवारी, ३ ऑगस्ट, २०२३ रोजी पत्रकार परिषदेत दिला होता. पोलिसांनी अटकेची कारवाई न केल्याचा आरोप करून महिलेने दुपारी वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच, पोलिसांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.

न्याय न मिळाल्यास विष प्राशन करू, असा इशारा देणाऱ्या महिलेला सोमवारी (दि. ७) वरोरा ठाण्यात बोलविले होते. ठाण्यात आल्यानंतर प्रकरणाची सर्व कायदेशीर बाबी त्यांना समजावून सांगितली. या प्रकरणातील चारपैकी तीन आरोपींना अटक झाली. तिघांना न्यायालयात हजर केल्याची माहितीही दिली, परंतु त्या ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या.

- आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूरPoliceपोलिसwarora-acवरोरा