वेकोलिचे प्रदूषण ठरतेयं जीवघेणे

By admin | Published: June 9, 2014 11:32 PM2014-06-09T23:32:17+5:302014-06-09T23:32:17+5:30

पृथ्वीतलावरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मानवाचे पर्यावरण संरक्षणाकडे झालेले दुर्लक्ष आहे. प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा

Vicollis pollution leads to fatality | वेकोलिचे प्रदूषण ठरतेयं जीवघेणे

वेकोलिचे प्रदूषण ठरतेयं जीवघेणे

Next

शेतकर्‍यांचेही नुकसान : पर्यावरण संरक्षणाचे धिंडवडे
सास्ती : पृथ्वीतलावरील वातावरणातील बदलामुळे अनेक नैसर्गिक संकटांना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मानवाचे पर्यावरण संरक्षणाकडे झालेले दुर्लक्ष आहे. प्रचंड वृक्षतोड, पाण्याचा अर्मयाद उपसा, वाहनांचे वाढते प्रमाण तसेच वाढते औद्योगिकरण हे सर्व पर्यावरण संतुलित राखण्यात बाधक ठरत आहे. त्यामुळे भविष्यात मानवाला सुखी व समृद्ध जीवन जगणे कठीण होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे. अशातच राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या विविध कोळसा खाणींमुळे होणार्‍या प्रदूषणामुळे परिसरात पर्यावणाचा मोठा र्‍हास होत असल्याचे दिसत आहे. मात्र वेकोली प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत राजुरा तालुक्यात सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवनी तसेच नव्याने झालेल्या गोयेगाव अशा विविध कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाण परिसरात कमालीचे प्रदूषण वाढलेले आहे. मोठय़ा प्रमाणात धुळीचे लोंढे पसरले जात आहे. कोळसा उत्पादनासाठी खोलवर खोदकाम करुन मोठय़ा प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. कोळसा खाणीत होणार्‍या ब्लॉस्टींगमुळे मोठय़ा प्रमाणात ध्वनी प्रदूषणही होत आहे. तर उत्पादन केलेला कोळसा वाहून नेण्याकरिता होणारी वाहतुकही योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे प्रदूषणात वाढ झालेली आहे. प्रदूषणामुळे परिसरातील अनेक गावांना त्रास सहन करावा लागत असून लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंतच्या सर्वच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून दमा, फुफ्फुसाचे आजार बळावले आहे. प्रदूषणामुळे परिसरातील शेती उत्पादनातही घट झाली आहे. प्रदूषणावर आळा घालण्याच्या दृष्टीने वेकोलि प्रशासन मात्र कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळही निद्रावस्थेत आहे. त्यांचेही वेकोलिच्या किंवा जिल्ह्यातील विविध कारखाण्यांमुळे होणार्‍या प्रदूषणाकडे दुर्लक्ष आहे. वेकोलि विविध फलके लावून व फक्त कार्यक्रम घेऊन पर्यावणाचे संरक्षणाचा कांगावा करीत आहे. वेकोलिने खाण परिसरात वृक्षांची लागवड केली. परंतु त्यांचे संरक्षण करण्यात ते असर्मथ ठरले आहे. वेकोलिच्या या प्रदूषणामुळे कोळसा खाण परिसरातीलच नागरिक नव्हे तर कोळसा खाणीत काम करणारे कामगार व त्या परिसरातील कामगार वसाहतीमध्ये राहणार्‍या त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे वेकोलि प्रशासन नागरिकांच्या नव्हे तर आपल्या कामगारांच्याही जिवावर उठला आहे.  (वार्ताहर)
 

Web Title: Vicollis pollution leads to fatality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.