नारंडा येथे साकारणार पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:31 IST2021-05-25T04:31:41+5:302021-05-25T04:31:41+5:30

नारंडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत अतिशय जीर्ण झाली होती. त्यामुळे या रुग्णालयात डॉक्टरांना काम करणे अवघड जात होते. तसेच ...

Veterinary hospital building to be constructed at Naranda | नारंडा येथे साकारणार पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत

नारंडा येथे साकारणार पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत

नारंडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत अतिशय जीर्ण झाली होती. त्यामुळे या रुग्णालयात डॉक्टरांना काम करणे अवघड जात होते. तसेच पशुपालकांनासुद्धा रुग्णालयात अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. रुग्णालयाची इमारत ही अतिशय जुनी असल्यामुळे रुग्णालयात आधुनिक सोयी-सुविधांचा अभाव होता. या सर्व बाबींची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती उरकुडे यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा सुरू केला.

त्यांच्या मागणीची दखल घेत उरकुटे यांनी नारंडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीकरिता ९८ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. नारंडा, लोणी, पिपरी, शेरज बु, शेरज खुर्द, वनसडी, सोनुर्ली गावांचा या रुग्णालयांतर्गत समावेश होतो. रुग्णालयाची इमारत मंजूर झाल्यामुळे येथील पशुपालकांना याचा लाभ होणार आहे.

Web Title: Veterinary hospital building to be constructed at Naranda