लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती, चारवट आदी गावांतील शेतकरी व दुध उत्पादकांना जनावरांची निगा राखण्यासाठी नांदगाव (पोेडे) येथे लवकरच पशुवैद्यकीय दवाखाना सुरू होणार आहे. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे पशुवैद्यकीय दवाखान्याला मंजुरी मिळाल्याची माहिती बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे यांनी दिली.तालुक्यातील एकच पशुवैद्यकीय दवाखाना शहराच्या ठिकाणी आहे. शेतकरी व दुध उत्पादकांना जनावरांच्या उपचारासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी पशुसंवर्धन विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केला होता. मात्र, त्यावेळी संबंधित विभागाने लक्ष दिले नाही. यासंदर्भात पंचायत समितीने ठराव पारित केला. पं. स. च्या प्रस्तावासह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुंबई येथे शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन दिले होते. दरम्यान अधिकाºयांची बैठक घेवून पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रश्न तातडीने निकाली काढला आहे.
नांदगावात पशुवैद्यकीय केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:27 IST
तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती, चारवट आदी गावांतील शेतकरी व दुध उत्पादकांना जनावरांची निगा राखण्यासाठी नांदगाव (पोेडे) येथे लवकरच पशुवैद्यकीय दवाखाना सुरू होणार आहे. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे पशुवैद्यकीय दवाखान्याला मंजुरी मिळाल्याची माहिती बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे यांनी दिली.
नांदगावात पशुवैद्यकीय केंद्र
ठळक मुद्देमुनगंटीवार यांचे प्रयत्न : पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा