नांदगाव येथे पशुचिकित्सा शिबिर
By Admin | Updated: March 26, 2016 00:47 IST2016-03-26T00:47:02+5:302016-03-26T00:47:02+5:30
येथील पंचायत समितीअंतर्गत पशु संवर्धन विभागाच्यावतीने नांदगाव (पोडे) येथील ग्रामपंचायत समोर पशुचिकित्सा शिबिर बुधवारी आयोजित करण्यात आले होते.

नांदगाव येथे पशुचिकित्सा शिबिर
शेतकऱ्यांना साहित्याचे वितरण : पशुसंवर्धन विभागाचे आयोजन
बल्लारपूर : येथील पंचायत समितीअंतर्गत पशु संवर्धन विभागाच्यावतीने नांदगाव (पोडे) येथील ग्रामपंचायत समोर पशुचिकित्सा शिबिर बुधवारी आयोजित करण्यात आले होते. यात जनावरांचे रोगनिदान, वंधत्व तपासणी, लसिकरण करून शेतकऱ्यांना जनावरांचे औषधी साहित्यांचे मोफत वितरण करण्यात आले.
शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव (पोडे) येथील सरपंच प्रमोद देठे, माजी सभापती अॅड. हरिश गेडाम, माजी सरपंच गोविंदा पोडे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विश्वनाथ मुक्के, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.एस. लेकामी, डॉ. दिलीप भुसारी यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना रामभाऊ टोंगे म्हणाले, आज निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीव्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे. त्यामुळए शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करावा. यामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीला पुरक व्यवसायाशी जोडून घ्यावे, अल्पभूधारक, शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेवून स्वत:चे उत्पन्न वाढवावे, असे त्यांनी सांगितले. संचालन डॉ.व्ही.एस लेकामी यांनी केले. (शहर प्रतिनिधी)