लसीचा अत्यल्प साठा, नागरिकांकडून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:14+5:302021-04-22T04:29:14+5:30
चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी सुरू केली आहे. दरम्यान, लाॅकडाऊन करण्याची ...

लसीचा अत्यल्प साठा, नागरिकांकडून संताप
चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी सुरू केली आहे. दरम्यान, लाॅकडाऊन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. मात्र केंद्रावर लसच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवारी जिल्ह्यात १४ हजार लस उपलब्ध झाल्यानंतर केंद्रात पाठविण्यात आल्या. मात्र नागरिकांनी गर्दी केल्याने अनेकांना लस न घेताच वापस जावे लागते.
मागील पंधरा दिवसांपासून लसीकरणाने चांगलाच वेग घेतला होता. नागरिकही मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी केंद्रावर जात होते. लसीकरण करण्यासाठी एकीकडे आवाहन केले जात असतानाच दुसरीकडे लस उपलब्धच नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला गेला. विशेष म्हणजे, मंगळवारी येथील काही केंद्रावर लस उपलब्ध झाल्याचे नागरिकांना माहीत होताच त्यांनी केंद्रावर धाव घेतली. या केंद्रावर तर संचारबंदीचे तीनतेरा वाजले. गर्दी बघून नागरिकांनी दुसऱ्या केंद्राकडे धाव घेतलीस, मात्र तिथेही लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे शासनाने किमान लस तरी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.