उभ्या ट्रकला दुचाकी धडकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:11 IST2018-10-26T23:11:01+5:302018-10-26T23:11:28+5:30
नादुरूस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना मागून येणाऱ्या दुचाकीने ट्रकला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजता वरोरा-वणी मार्गावर शेंबळ शिवारात घडली. घटनेनंतर ट्रकला आगही लावण्यात आली.

उभ्या ट्रकला दुचाकी धडकली
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : नादुरूस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा असताना मागून येणाऱ्या दुचाकीने ट्रकला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजता वरोरा-वणी मार्गावर शेंबळ शिवारात घडली. घटनेनंतर ट्रकला आगही लावण्यात आली.
रूपेश उध्दव बोढे (३५) रा. बावणे लेआॅऊ ट वरोरा असे मृतकाचे नाव आहे. एमएच ३४ एक्स ६११२ या क्रमांकाच्या दुचाकीने रूपेश बोढे हे वणीवरून वरोराकडे येत होते. दरम्यान, एक नादुरुस्त ट्रक (एम. एच. ३४ पी. ४६४२) रस्त्यावर उभा होता. भरधाव येणाºया दुचाकीने या ट्रकलाच धडक दिली.
यात दुचाकीस्वार रूपेश बोढे हे गंभीर जखमी झाले. वरोरा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेले असता वैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषित केले. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून दिला. लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर ट्रकला लागलेली आग विझविण्यात आली. अनेक रस्त्यावर असे नादुरुस्त वाहने उभी असतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत.