वाहन चोरट्यांना अटक
By Admin | Updated: June 5, 2015 01:09 IST2015-06-05T01:09:31+5:302015-06-05T01:09:31+5:30
शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहने चोरीला जात होते. मात्र चोरट्यांचा थांगपता लागत नव्हता. पोलिस प्रशासनाने वाहन चोर पकडण्यासाठी पथक नेमले.

वाहन चोरट्यांना अटक
ब्रह्मपुरी: शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहने चोरीला जात होते. मात्र चोरट्यांचा थांगपता लागत नव्हता. पोलिस प्रशासनाने वाहन चोर पकडण्यासाठी पथक नेमले. दरम्यान, दोन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई ब्रह्मपुरी पोलिसांनी केली.
अटकेतील आरोपींची नावे सुभाष डोंगरवार व किशोर जांभुळकर असे असून दोघेही गोंदिया जिल्ह्यातील धाबेटेकडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी पोलिसात गुन्ह्याची कबुली दिली आहे. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. यामुळे वाहन चालक चांगलेच धास्तावले होते. याची तक्रार पोलिसात करण्यात आली. मात्र वाहन चोरांचा सुगावा लागत नव्हता.
अशातच उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात चोरांना जेरबंद करण्यासाठी पथक नेमण्यात आले. पोलीस निरीक्षक किशोर नगराळे, पोलीस कर्मचारी गोवर्धन पानसे, शेडमाके, दुधे यांच्या पथकाने गोंदिया जिल्ह्यातील सुभाष डोंगरवारला पहिल्यांदा चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्रारंभी त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र पोलिसी हिसका दाखविताच त्याने साथीदार किशोर जांभुळकर सोबत दुचाकी वाहनाची चोरी केल्याचे मान्य केले. आरोपीकडून हिरो पॅशन प्रो, पॅनश प्लस, सीडी डिलक्स अशी चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आल्या असून आणखी चार-पाच वाहने जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (तालुका प्रतिनिधी)