वीर बाबूराव शेडमाके जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST2021-03-16T04:28:43+5:302021-03-16T04:28:43+5:30

चिमूर : गोंडवाणा प्राण हितेचा पुत्र शहीद वीर बाबूराव शेडमाके यांची १८२ वी जयंती शेडमाके चौक, कांपा रोड, चिमूर ...

Veer Baburao Shedmake Jayanti | वीर बाबूराव शेडमाके जयंती

वीर बाबूराव शेडमाके जयंती

चिमूर : गोंडवाणा प्राण हितेचा पुत्र शहीद वीर बाबूराव शेडमाके यांची १८२ वी जयंती शेडमाके चौक, कांपा रोड, चिमूर येथे साजरी करण्यात आली. दरम्यान, सेवा सेवाच्या गजराने वीर बाबूराव शेडमाके यांना आदरांजली वाहिली.

गोंडी परंपरेने बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करून चौकातील फलकाला माल्यार्पण केले. पेरसापेन सुमरण व बाबूराव शेडमाके यांचा रेला पाटा म्हणून त्यांच्या कार्याची आठवण करण्यात आली. ‘बाबूराव शेडमाके अमर रहे, अमर रहे’ असा जयजयकार करीत आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी जागतिक गोंड सगा मांदी शाखा चिमूरचे अध्यक्ष मनोजसिंह गोंड मडावी, जागोस मांदीचे सदस्य दिलीपसिंह गोंड वटे, लक्ष्मण गोंड मडावी, दीपक गोंड कुमरे, संजय मेश्राम, रघुनाथ कन्नाके, डी. वाय. धुर्वे, सुधीर मसराम, शंकर मडावी, धैर्य वटे, वेदांत मडावी, जतीन वटे, स्मिता मडावी, कुंदा वटे, गीता मडावी, कविता मसराम, किरण मेश्राम, युक्ता मडावी, रक्षा मडावी, नेत्रा वरखेडे आदी उपस्थित होते

Web Title: Veer Baburao Shedmake Jayanti