साईबाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला व मुलांसाठी विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:33 IST2021-01-16T04:33:18+5:302021-01-16T04:33:18+5:30
चंद्रपूर : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून साईबाबा बहुउद्देशीय संस्था पेंढारी (मक्ता) तर्फे संस्थेच्या अध्यक्षा ...

साईबाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे महिला व मुलांसाठी विविध कार्यक्रम
चंद्रपूर : राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून साईबाबा बहुउद्देशीय संस्था पेंढारी (मक्ता) तर्फे संस्थेच्या अध्यक्षा नंदा अल्लूरवार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरात मुले व महिलांसाठी विविध स्पर्धा पार पडल्या. यावेळी मुलांसाठी चित्रकला, वक्तृत्व, सामान्य ज्ञान व स्त्रियांसाठी रांगोळी, वन मिनिट शो, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे, युवासेना जिल्हा प्रमुख नीलेश बेलखेडे, शहर प्रमुख अक्षय अंबिरवार, माजी नगरसेविका अनिता कथडे, कमल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष नेत्रा इंगूलवार, यंग चांदा ब्रिगेडचे विमल काटकर, शिला जीझीलवार, राजमाता यंग ग्रुपच्या प्रगती पडगेलवार, पतंजली चंद्रपूर जिल्हा महिला प्रभारी रेबनकर आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी मार्गदर्शनातून राजमाता जिजाऊ यांचा जीवनपट उलगडला. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.