पोंभुर्णा तालुक्यातील विविध समस्यांचे निराकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:21 IST2021-06-05T04:21:36+5:302021-06-05T04:21:36+5:30
राज्याचे नगरविकास, ऊर्जा व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील दौरावर आले असता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ...

पोंभुर्णा तालुक्यातील विविध समस्यांचे निराकरण करावे
राज्याचे नगरविकास, ऊर्जा व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील दौरावर आले असता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी यांनी निवेदन दिले होते, तसेच सन २०१९-२०२० पासून तालुक्यातील रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना व इतर घरकुलाचे अनुदान रखडले आहे. त्यामुळे अनेका लाभार्थ्यांना अनेक समस्याचा सामना करावा लागत असून, ऐन पावसाळ्यात कुटुंबीयांना उघड्यावर राहावे लागण्याची वेळ आलेली आहे. कोरोना काळातील अनेक कुटुंबीयांना रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली असल्याने, विद्युत बिलात सूट देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पोंभुर्णाचे अध्यक्ष भुजंग ढोले व अन्य पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केलेली आहे.