पोलीस विभागातील अनेकांच्या बदल्या

By Admin | Updated: May 29, 2014 02:10 IST2014-05-29T02:10:29+5:302014-05-29T02:10:29+5:30

तीन वर्षाचा काळ पूर्ण करणार्‍या जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.

Various of Police departments | पोलीस विभागातील अनेकांच्या बदल्या

पोलीस विभागातील अनेकांच्या बदल्या

चंद्रपूर : तीन वर्षाचा काळ पूर्ण करणार्‍या जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात जिल्ह्यातील महत्वाच्या पोलीस ठाण्यांतील अधिकार्‍यांचा समावेश आहे.

रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी विश्‍वनाथ बचाटे यांची बदली यवतमाळमध्ये करण्यात आली आहे. त्यासोबतच पोलीस निरीक्षक प्रभुदास दौलतराव इंगळे यांची अमरावती शहर येथे बदली झाली आहे. बाहेर जिल्ह्यातून काही पोलीस निरीक्षक चंद्रपूर जिल्ह्यात बदलून आले आहेत. यामध्ये नागपूर येथून पोलीस निरीक्षक प्रभाकर गुलाबराव तिक्कम, ठाणे शहरामधून पोलीस निरीक्षक स्वप्नील धोंडीराम धुळे, यवतमाळ येथून प्रल्हाद रुपराव गिरी, अमरावती शहर येथून रघुनाथ चौधरी येथे आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. यात सहायक पोलीस निरीक्षक किशोर सदाशिव शिंदे यांची कोकण परिक्षेत्र, सहायक पोलीस निरीक्षक अजय शेमराज भुसारी यांची एसीबी, सहायक पोलीस निरीक्षक भाऊराव श्रीधर बिराजदार यांची कोल्हापूर, सहायक पोलीस निरीक्षक रवी श्यामराव नागोसे यांची एटीएस, दीपमाला सुरेशराव भेंदे यांची राज्य गुन्हे विभाग येथे बदली झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय नामदेव देशमुख यांची राज्य गुन्हे विभाग, पोलीस उपनिरीक्षक विनोद शिवप्रसाद तिवारी यांची नागपूर, मधुकर तुळशिराम चांदेकर यांची बीड, सतीश राठोड यांची गोंदिया येथे बदली झाली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Various of Police departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.