वडेट्टीवारांची नार्को टेस्ट करा-देशकर
By Admin | Updated: August 30, 2015 00:42 IST2015-08-30T00:42:41+5:302015-08-30T00:42:41+5:30
जिल्ह्यात कॉंग्रेसच्या नेत्यांनी दारू विकावी, असा खटाटोप आ.विजय वडेट्टीवार यांनी सुरू केला असल्याचा आरोप करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल देशकर यांनी

वडेट्टीवारांची नार्को टेस्ट करा-देशकर
चंद्रपूर : जिल्ह्यात कॉंग्रेसच्या नेत्यांनी दारू विकावी, असा खटाटोप आ.विजय वडेट्टीवार यांनी सुरू केला असल्याचा आरोप करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल देशकर यांनी आ.वडेट्टीवार यांची नार्को टेस्ट करावी, अशी थेट मागणी केली आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दारूबंदी फसल्याचा दावा केला. यावर प्रा.अतुल देशकर यांनी टिकेची झोड उठविली. जे नेहमी आपली भूमिका बदलतात. त्यामागे काही तरी रहस्य दडले असते, असे प्रा.देशकर म्हणाले. विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याकडून चंद्रपूर जिल्ह्यात येणारी दारू बंद झाल्याने आ. वडेट्टीवार व्यथित झाले असल्याचा आरोप प्रा. देशकर यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात दारू विक्रेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेला मदत होईल, असा आरोप आ.विजय वडेट्टीवार यांनी करणे हा षडयंत्राचा भाग आहे, असे स्पष्ट करून आ.वडेट्टीवारांनी दारू विक्री संदर्भात विधानसभेत किती तारांकीत प्रश्न उपस्थित करून लक्षवेधी सूचना मांडल्या, याचा हिशेब त्यांनी जनतेसमोर मांडवा, अशी मागणीही प्रा.अतुल देशकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)