वरोरा उपजिल्हा रुग्णालय डॉ.आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित
By Admin | Updated: March 19, 2017 00:38 IST2017-03-19T00:38:15+5:302017-03-19T00:38:15+5:30
महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी स्मृतीप्रित्यर्थ ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रूग्णालयांना महिला व बालकांच्या....

वरोरा उपजिल्हा रुग्णालय डॉ.आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित
वरोरा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी स्मृतीप्रित्यर्थ ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रूग्णालयांना महिला व बालकांच्या आरोग्यासंबंधी उत्कृष्ठ कार्याबद्दल देण्यात येणारा जिल्हा स्तरीय डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार वरोरा उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आला.
महिला व बालकांच्या आरोग्याची उत्कृष्ठ कार्याबद्दलचा सन २०१६-१७ चा पुरस्कार मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. चंद्रपूर यांचे हस्ते देण्यात आला. तर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गो. वा. भगत यांनी तो पुरस्कार स्वीकारला. सदर पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह व ५० हजार रुपये रोख असे आहे.
राज्य स्तरावरील निवळ समितीने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे भेट देवून या पुरस्कारासाठी असलेल्या अटी शर्तीची पाहणी केली. त्यात मुख्यत्त्वे रूग्णालयाची स्वच्छता तसेच २०१५-१६ चे वार्षिक लक्ष स्त्री शस्त्रक्रिया ५६६, पुरुष शस्त्रक्रिया ४२ झाल्या. तर एक हजार ४० गरोदर मातांची नोंदणी करण्यात आली असून दोन हजार ५३६ गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ०८ एचआयव्ही बाधीत रुग्ण आढळ्ले. त्याच्यबरोबर एक हजार४० प्रसुती करण्यात आल्या. १४६ सत्राच्या माध्यमातून एक वर्षाखालील बांलकांना लसीकरण करण्यात आले असून दोन हजार २१६ पुरुषांची व ८५५ महिलांची एचआयव्ही रक्त तपासणी करण्यात आली. असून ३४ पुरुष व १८ महिला या एचआयव्ही बाधित आढळल्या असून त्यांना एआरटीला संलग्न करण्यात आले आहेत. हे सर्व वार्षिक लक्ष पूर्ण करुन स्वच्छता व रुग्णसेवा यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सदर पुरस्कार देवून सन्मानित केले. (तालुका प्रतिनिधी)