वेकोलिला कोट्यवधीचा फटका

By Admin | Updated: February 5, 2015 23:06 IST2015-02-05T23:06:40+5:302015-02-05T23:06:40+5:30

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती कोळसा खाणीत १९९८ मध्ये नवीन सीएचपीचे काम सुरू झाले आणि सुरू झालेले काम मधेच बंद करण्यात आले आहे.

Vaolocila crores of shots | वेकोलिला कोट्यवधीचा फटका

वेकोलिला कोट्यवधीचा फटका

बी.यू. बोर्डेवार - राजुरा
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती कोळसा खाणीत १९९८ मध्ये नवीन सीएचपीचे काम सुरू झाले आणि सुरू झालेले काम मधेच बंद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे वेकोलिला कोट्यवधीचा फटका बसला आहे.
सास्ती कोळसा खाणीत नवीन सीएचपीच्या कामाचा शुभारंभ १९९८ मध्ये मोठ्या थाटात करण्यात आला होता. या कामावर चार ते पाच कोटी रुपये खर्चुन नवीन यंत्रसामग्री, सीएचपी स्ट्रम्पर तयार करण्यात आले. मात्र पाणी कुठे मुरले कुणास ठाऊक. अचानक काम मधेच बंद करण्यात आले. या सीएचपीसाठी आणलेली कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री काही काळ धूळखात होती. परंतु आता २०१५ मध्ये येथील साहित्याची चोर, माफीयामार्फत भंगारात विक्री होत आहे. या स्थळाची पाहणी केली असता कोट्यवधींचे संयंत्र भंगारात गेल्याचे दिसून आले. परंतु वेकोलिच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या सीएचपीचे काम बंद पाडणाऱ्या वेकोलिच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. सास्ती येथील नवीन सीएचपीचे काम पूर्ण झाले असते तर जवळपास एक लाख टन कोळशाचा साठा करून ठेवण्याची सोय झाली असती. सोबतच रेल्वे रॅकची लोडींग झाली असती. शिवाय कोळसा चोरी करणाऱ्यांवर प्रतिबंध घालता आला असता. आता रेल्वे रॅक लोडींगकरिता ट्रकमालकाना पैसे मोजावे लागत आहे. या सर्व बाबी वेकोलिच्या फायद्याच्या ठरणाऱ्या होत्या. मात्र सीएचपीचे काम बंद केल्यामुळे वेकोलिला हे काम अपूर्ण अवस्थेत बंद करण्यात आले. येथील लोखंडी अँगल, साहित्य गाड्यामध्ये भरून मागील वर्षात भंगार चोरट्यांनी विकून टाकल्याची माहिती आहे. तरीही वेकोलिची सुरक्षा यंत्रणा जागी झाली नाही.
नुकतेच वेकोलिच्याच सुरक्षा वाहनातून वेकोलि साहित्य चोरून नेताना पकडण्यात आले होते, हे विशेष. वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक यांचा वचक नसल्यामुळे वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची विजीलन्सतर्फे चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Vaolocila crores of shots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.