मानधन वाढ मिळेपर्यंत लढणार
By Admin | Updated: June 26, 2017 00:40 IST2017-06-26T00:40:07+5:302017-06-26T00:40:07+5:30
केंद्रात नवीन सरकार आले असले तरी अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

मानधन वाढ मिळेपर्यंत लढणार
दहिवडे : अंगणवाडी सेविकांचा मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : केंद्रात नवीन सरकार आले असले तरी अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मागील सहा वर्षाचे कार्यकाळात अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. भाजपाचे शासन केंद्रात येताच जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आज मात्र निराशा पदरी पडली आहे. मात्र अंगणवाडी सेविकांना न्याय मिळेपर्यंत आपण लढा सुरुच ठेऊ, असे प्रतिपादन प्रा. दहिवडे यांनी केले.
ब्रह्मपुरी तालुक्यातील अंगणवाडी महिलांचा मेळावा सुनंदा आक्केवार यांचे अध्यक्षतेखाली शनिवारला पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रास्ताविक भाषणात रूपाली नरूले म्हणाल्या अंगणवाडी महिलांच्या मानधन वाढीकरिता मानधन वाढ कमेटीचे गठण करण्यात आले. वर्ष लोटूनही राज्य शासनाने मानधन वाढीचा निर्णय घेतला नाही. आमदारांच्या मानधनात रातोरात दूप्पटीने वाढ कशी केल्या जाते असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार सविता बावनवाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी आशा आखले, जिजा लोणारे, रंजना झरकर, २ टोमटी, शालू मलोडे, यांनी प्रयत्न केले.