बल्लारपुरात वाल्मिकी जयंती साजरी
By Admin | Updated: October 23, 2016 01:13 IST2016-10-23T01:13:23+5:302016-10-23T01:13:23+5:30
रामायण रचनाकार ऋषी वाल्मिकी यांची जयंती येथे वाल्मिकी मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.

बल्लारपुरात वाल्मिकी जयंती साजरी
बल्लारपूर : रामायण रचनाकार ऋषी वाल्मिकी यांची जयंती येथे वाल्मिकी मित्र मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष घनशाम मुलचंदानी, देवेंद्र आर्य, नरसिंग रेब्बावार, विजय मोगरे हे होते. प्रारंभी ऋषी वाल्मिकी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
अतिथींनी आपल्या भाषणातून ऋषी वाल्मिकी यांनी केलेल्या कार्याची व शिकविणीविषयी माहिती सांगितली. अनिल महाराज यांनी वाल्मिकी ऋषीच्या पुतळ्याची विधीवत पूजा केली. यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
वाल्मिकी समाज बांधवांसोबतच मित्र मंडळाचे लोकेंदर लाहोरे, कर्मवीर सौदागर, विक्रम सोहारे, राजबीर सौदागर, वेदप्रकाश रजोरा, पालसिंग चिंडालिया, मनोज चुनियाने, संतोष पारचे यांची याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन लोकेंदर लाहोरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)