शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

वेकोलि प्रकल्पग्रस्तांनी दिला पुन्हा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: March 1, 2016 00:36 IST

कोळसा खाणीसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास होत असलेल्या टाळाटाळीच्या धोरणामुळे प्रकल्पग्रस्तांनी ...

बेमुदत उपोषण स्थगित : मात्र केव्हाही होऊ शकते आंदोलनचंद्रपूर : कोळसा खाणीसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यास होत असलेल्या टाळाटाळीच्या धोरणामुळे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत आंदोलन सुरू केले. मात्र माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मध्यस्तीनंतर हे आंदोलन थांबविण्यात येवून थोेडी प्रतीक्षा करण्याचे ठरले. असे असले तरी, आपल्या कुटुंबियांसह खाणीमध्ये उतरून केव्हाही बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे विदर्भ मजदूर संघ आणि बळीराजा आता जागा हो, या ंसंघटनेच्या वतीने पायली, पायली-भटाळी, किटाळी-सिनाळा, मसाळा, नवेगाव, तिरवंजा येथील वेकोलिच्या प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी सकाळी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरूवात केली. त्यातील सिनाळा येथील राजू पंढरी वैद्य, पंकज दिवाकर जिंदेवार, भटाळी येथील राकेश सिताराम खाडीलकर आणि सुधाकर श्यामराव दारोकर या चौघांनी बेमुदत आंदोलनाला सुरूवात केली. आपल्या माण्या मान्य होत नाह तोवर उपोषण मागे घ्यायचे नाही या निर्धाराने उपोषणासाठी बसलेल्या या चौघांच्या समर्थनासाठी गावातील शेकडो महिला-पुरूषही आले होते. सायंकाळपर्यंत हे उपोषण चालल्यावर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मध्यस्ती करून हे बेमुदत उपोषण स्थगित केले. त्यानंतर सायंकाळी उपोषण मंडपात तशी घोषणाही करून भविष्यातही हे आंदोलन यापेक्षाही तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनामध्ये गावकऱ्यांसह विदर्भ मजदूर संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (जिल्हा प्रतिनिधी) केंद्रीय कोळसा राज्यमंत्र्यांना पत्रदरम्यान, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी केंद्रीय कोळसा आणि उर्जाराज्यमंत्री पियुष गोयल यांना एक पत्र लिहून या शेतकऱ्यांची व्यथा कळविली. मागील ११ महिन्यांपासून वेकोलिने या गावातील शेतकऱ्यांना वेठीस धरल्याने त्यांचे जगणे कसे असहाय झाले आहे, हे कळविले. गावातील संपूर्ण शेती अधिग्रहीत न करता सात टक्के जागा अधिग्रहीत न केल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होणार आहे. त्यामुळे सरसकट सर्व शेतजमीन अधिग्रहीत करावी, गावकऱ्यांचे लवकर पूनर्वसन करावे आदी मागण्या या पत्रातून केल्या आहेत. आवश्यकता नसेल तर वेकोलिने जमिनी परत कराव्यात - पुगलियादरम्यान, या प्रसंगी उपोषण मंडपात घेतलेल्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार नरेश पुगलिया म्हणाले, शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्याचा मोबदला न देणे हा प्रकार शेतकऱ्यांना वेठीस धरणारा आहे. अनेक दिवसांपासून संपादित केलेल्या या जमिनी वेकोलिच्या उपयोगाच्या नसतील तर त्या परत कराव्या. प्रकल्पग्रस्तांच्या भावनांशी खेळण्याचे काम वेकोलि करीत आहे. त्यामुळेच ही आंदोलनाची वेळ आली आहे. आपण या प्रकरणी मध्यस्ती करून १५ मार्चपर्यंत प्रतीक्षा करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार हे आंदोलन आजच्यापुरते थांबले असले तरी लढा मात्र तीव्रपणे सुरूच राहणार आहे. या संदर्भात न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली जाणार असून त्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. वेकोलिने अधिक अंत न पहाता शेतकऱ्यांना व्याजासह रक्कम, पक्की नोकरी, गावातील शेतमजुरांना तीन लाख रूपये, धुऱ्याचे मोजमाप घेऊन त्याची एकरी किंमत आदी मागण्या मान्य कराव्या, असे त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सांगितले.