२० हजाराची लाच घेताना वेकोलि कर्मचाऱ्याला अटक
By Admin | Updated: December 30, 2016 01:22 IST2016-12-30T01:22:21+5:302016-12-30T01:22:21+5:30
येथील वेकोलिच्या लालपेठ उपक्षेत्रातील लिपिकाला २० हजार रूपयांची लाच स्विकारताना गुरूवारी दुपारी रंगेहात अटक करण्यात ाली.

२० हजाराची लाच घेताना वेकोलि कर्मचाऱ्याला अटक
चंद्रपूर : येथील वेकोलिच्या लालपेठ उपक्षेत्रातील लिपिकाला २० हजार रूपयांची लाच स्विकारताना गुरूवारी दुपारी रंगेहात अटक करण्यात ाली.
उत्तम मेश्राम असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो लिपिक पदावर कार्यरत आहे. या उपक्षेत्रातील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने पतीच्या पीएफमधील रक्कम मिळावी म्हणून अर्ज केला होता. त्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यक्ता होती. ही कागदपत्रे तयार करण्यासाठी २० हजार रूपये द्यावे, अशी मागणी त्याने केली होती.
मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने सदर महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सापळा रचल्यानुसार गुरूवारी कार्यालयातच एका मध्यस्त महिलेच्या माध्यमातून लाचेची रक्कम स्विकारताना सीबीआयच्या पथकाकडून अटक करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)