वाकल बोडी तलावाला भगदाड
By Admin | Updated: June 3, 2015 01:28 IST2015-06-03T01:28:45+5:302015-06-03T01:28:45+5:30
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत वासेरा ग्रामपंचायत हद्दीतील वाकल बोडी येथील मामा तलाव मायनर गेट जवळ भगदाड पडले आहे.

वाकल बोडी तलावाला भगदाड
वासेरा : सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत वासेरा ग्रामपंचायत हद्दीतील वाकल बोडी येथील मामा तलाव मायनर गेट जवळ भगदाड पडले आहे. या भगदाडाची दुरुस्त करण्याची मागणी पत्र संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांना दिले. मात्र अजूनपर्यंत पंचायत समिती सिंचाई विभागाने भगदाड दुरुस्त केलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात तलाव कोरडा राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
तलावाच्या गेटची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाकल बोडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. वासेरा गावाशेजारी वाकल बोडी तलाव असून तलावाची आराजी १.९२ हेक्टर आहे. त्या तलावाच्या पाण्यावर ५० ते ६० शेतकरी अवलंबून आहेत. ३०० हेक्टरच्या आसपास सिंचन क्षमता असलेला तलाव गेट नादुरस्त असल्याने पाणी तलावात साचून राहत नाही. या वर्षी फक्त तलवाच्या सभोवताल माती काम करण्यात आले. परंतु गेटचे काम केलेले नाही. यापूर्वी गेट दुरुस्ती करीता ग्रामपंचायतीने पंचायत समितीला पत्र पाठविला. वामन बोरकर यांनी पत्र व्यवहार केला. परंतु त्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
ग्रामपंचायत वासेरा अभियंता जि.प. सिंचाई विभाग सिंदेवाही यांना पत्र दिले. मात्र त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने पावसाळ्यात पाणी साचणार की नाही याविषयी नागरिकांत भिती आहे. (वार्ताहर)