वेकोलि बल्लारपूर क्षेत्राला कोट्यवधीचा फटका
By Admin | Updated: February 8, 2015 23:32 IST2015-02-08T23:32:23+5:302015-02-08T23:32:23+5:30
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या खाणीमध्ये अंधाधुंद कारभार सुरू आहे. वेकोलि बल्लारपूर क्षेत्रामधील नवीन खाणी सुरू करताना योग्य काळजी न घेतल्याने जवळपास

वेकोलि बल्लारपूर क्षेत्राला कोट्यवधीचा फटका
बी.यू. बोर्डेवार - राजुरा
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या खाणीमध्ये अंधाधुंद कारभार सुरू आहे. वेकोलि बल्लारपूर क्षेत्रामधील नवीन खाणी सुरू करताना योग्य काळजी न घेतल्याने जवळपास १०० कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. कोळशाच्या पाहणीसाठी सरकारतर्फे सर्व्हे करण्यात येतो. सदर सर्व्हे करताना योग्य दिशानिर्देशाचे पालन करून खाणीची निर्मिती करणे आवश्यक आहे. मात्र असे झाले नसल्याने अनेक खाणी बंद पडल्या आहे.
विरूर-सुबई परिसरातील खाणीवर जवळपास ७० कोटी रुपये खर्च करण्यात आले. येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनी हस्तांतरीत करण्यात आल्या. प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली परंतु खाण सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने बंद करण्यात आली.
येथे बांधकाम करताना योग्य काळजी घेण्यात आली नसल्याचा सूर आता कर्मचाऱ्यांत आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या थातुरमातुर कार्यप्रणालीमुळे या भागातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या ठिकाणी क्वार्टर तयार करण्यात आले. मात्र त्यातील काही क्वार्टर तोडण्यात आले आहे. या खाणी बंद पडण्यासाठी जबाबदार असलेल्या वेकोलि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
गोवरी-२ या खाणीच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत गोवरी-२ ही खाणसुद्धा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ३०० च्या वर कर्मचारी या खाणीत इतरत्र हलविण्यात आले. खाण सुरु केल्यानंतर काही वर्ष चालविल्यानंतर त्या लवकरच बंद करण्यात येतात. त्यामुळे शासनाला मोठा फटका बसत आहे. आता पवनी खुल्या खाणीचे काम सुरू आहे. या ठिकाणीसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात कोल बेंच नसल्याचे बोलल्या जात आहे.
बल्लारपूर क्षेत्रामध्ये कोलबेल्ट असला तरी भूगर्भ सर्व्हे योग्य न झाल्यामुळे वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राला कोट्यवधीचा फटका बसत आहे. यापूर्वी बल्लारपूर क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर अनेकवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. परंतु चौकशीला येणारे अधिकारी हे वेकोलिचेच असल्यामुळे कुठलीच कार्यवाही होताना दिसत नाही. कोळसा खाणीमध्ये कोळसा, यंत्र चोरीवर आळा घालणे गरजेचे असून संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.