जिल्ह्यात आज सात केंद्रांवरच होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST2021-05-05T04:47:24+5:302021-05-05T04:47:24+5:30
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने १९४ केंद्रे तयार केली, मात्र पुरेसे डोस उपलब्ध झाले नाही. त्यामुळे बूस्टर डोस ...

जिल्ह्यात आज सात केंद्रांवरच होणार लसीकरण
कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने १९४ केंद्रे तयार केली, मात्र पुरेसे डोस उपलब्ध झाले नाही. त्यामुळे बूस्टर डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांनाही काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोविड-१९ प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या आता वाढली. ग्रामीण भागातही प्रतिसाद मिळत आहे; पण लस उपलब्ध नाही. लस घेण्यासाठी केंद्रासमोर गर्दी करून घरी निघून जातात. पुरेसे डोस मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक केंद्रे बंद ठेवावे लागत आहेत. ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांसाठी या आठवड्यात चंद्रपूर शहरात दोन स्वतंत्र केंद्रे सुरू केली. पण प्रत्येक केंद्राला १०० ते ८० डोस देण्यात आल्याने अनेकांना परत घरी जावे लागले. ६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी उपलब्ध डोसनुसार चंद्रपूर मनपा क्षेत्रात केंद्र तयार आहेत. १ मेपासून १८ वर्षांवरील तरुणाईसाठी मोहीम सुरू झाली. पण, डोस नाहीत. त्यामुळे युवक-युवतींमध्ये नाराजी आहे. नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात केंद्रांची संख्या वाढवूनही डोसअभावी उद्दिष्टपूर्तीत खोडा निर्माण झाला आहे.