शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
3
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
4
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
5
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
6
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
7
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
8
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
9
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
10
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
12
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
14
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
15
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
16
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
17
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
18
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
19
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
20
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

अस्थायी कर्मचाऱ्यांचे केले लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST

मूल : येथील स्थायी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देत लसीकरण करण्यात आले. मात्र, अस्थायी कर्मचारी, सफाई कामगारांना रोज गर्दीमध्ये ...

मूल : येथील स्थायी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्करचा दर्जा देत लसीकरण करण्यात आले. मात्र, अस्थायी कर्मचारी, सफाई कामगारांना रोज गर्दीमध्ये काम करावे लागत असतानाही लसीकरण करण्यात आले नाही. यामुळे कामगारांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. याबाबत नगर परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी सदर अस्थायी कर्मचाऱ्यांना तत्काळ लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेळकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत एका दिवसात सर्व अस्थायी कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले.

मूल नगरपालिकेत शेकडो सफाई कामगार अस्थायी स्वरूपात कार्यरत आहेत. सदर कामगार रोज सकाळी गावात फिरून कचरा संकलनाचे काम करतात, यांच्यामुळेच गावाची स्वच्छता राखली जाते. स्थायी कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर म्हणून लसीकरण करण्यात आले. मात्र, मागील अनेक दिवसांपासून अस्थायी कर्मचाऱ्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत होते, याबाबत काही कामगारांनी लसीकरणाची मागणी नगरपालिकेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ व काही नगरसेवकांकडे केली होती. सदर मागणीनुसार क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून उपविभागीय अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनाची दखल घेत, एका दिवसात संपूर्ण अस्थायी कर्मचारी, सफाई कामगारांसाठी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करून सर्वांचे लसीकरण करण्यात आले.

या विशेष शिबिरासाठी नगर परिषद मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या नेतृत्वात नगर परिषद आरोग्य व स्वछता पर्यवेक्षक अभय चेपूरवार, डॉ.पूजा महेशकर, आशा निखाडे, नूतन भडके, राजेश्वरी मोकलेलू, अपर्णा अन्नमवार, तसेच नगर परिषद आणि आरोग्य कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.