मतदार यादीप्रमाणे लसीकरण केंद्र वॉर्डनिहाय जोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:58+5:302021-04-02T04:29:58+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेणे सोयीचे व्हावे. यासाठी ...

Vaccination centers should be added ward wise as per voter list | मतदार यादीप्रमाणे लसीकरण केंद्र वॉर्डनिहाय जोडावे

मतदार यादीप्रमाणे लसीकरण केंद्र वॉर्डनिहाय जोडावे

चंद्रपूर : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू झाले. नागरिकांना नजीकच्या केंद्रावर लस घेणे सोयीचे व्हावे. यासाठी शहर व गावातील प्रत्येक वार्डाला मतदान यादीप्रमाणे लसीकरण केंद्र जोडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज कोरोना टास्क समितीची बैठकीत दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गुल्हाने म्हणाले, जिल्ह्यात सध्या ८१ लसीकरण केंद्र सुरू आहेत. लस उपलब्ध झाल्यावर लगेचच २०० लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल. कोरोना रुग्णांसाठी सर्व ऑक्सिजन बेडवर अखंडित ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध आहे का, याबाबत खात्री करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, डॉ. प्रतीक बोरकर, डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. गणेश धोटे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

१४ लाख ८० हजार डोसेसची गरज

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ सर्वेक्षणात जिल्ह्यात २२ लाख ४२ हजार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली. त्यापैकी ४५ वर्षांवरील नागरिक एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के म्हणजे ६ लाख ७२ हजार ६१८ आहेत. त्यासाठी १४ लाख ८० हजार डोसेसची आवश्यकता राहणार आहे. नागपुरातून एक-दोन दिवसात लससाठा उपलब्ध होईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी दिली.

Web Title: Vaccination centers should be added ward wise as per voter list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.