आठ महिन्यांपासून पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:59 IST2019-02-25T22:58:53+5:302019-02-25T22:59:24+5:30
येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील आठ महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. पशुवैद्यकीय अधिकारी लेखामी यांची जुलै २०१८ रोजी बदली झाली. तेव्हापासून पद भरण्यात आले नाही.

आठ महिन्यांपासून पशु वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील आठ महिन्यांपासून वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. पशुवैद्यकीय अधिकारी लेखामी यांची जुलै २०१८ रोजी बदली झाली. तेव्हापासून पद भरण्यात आले नाही. सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दिलीप भुसारी हे एकटेच अतिरिक्त भार सांभाळत आहेत. दररोज किमान १५ ते २० जनावरे उपचारासाठी केंद्रात आणल्या जातात. परंतु, योग्य सेवा मिळत नाही.
तालुक्यातील हे एकमेव पशुवैद्यकीय दवाखाना असून बल्लारपूर, विसापूर, भिवकुंड, केम, दहेली, केमारी, बामणी, दहेली व नवी दहेली हे क्षेत्र येतात. दररोज येणाºया पशुंना वैद्यकीय सेवा दिल्यानंतर काही गंभीर आजारी जनावरांना शेतकऱ्यांच्या घरी जाऊन वैद्यकीय सेवा पुरवावी लागतात. पशुविषयक योजनांची माहिती घेऊन लोकांपर्यंत पोहचविणे, पशुधनाची गणना करणे ही कामे करावी लागतात. यात बराचसा वेळ जातो. त्यामळे ओपीडीमध्ये येणाऱ्या जनावरांकडे दुर्लक्ष होत आहे.
औषधांचा तुटवडा
श्वान औषधींचा तुटवडा जनावरांना श्वानाने चावा घेतल्यास येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील बऱ्याच महिन्यापासून प्रतिबंधक औषधी मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना जिल्हास्थळी जावे लागते.