vब्रह्मपुरीच्या सखींनी घेतले दांडिया प्रशिक्षण
By Admin | Updated: November 5, 2015 01:34 IST2015-11-05T01:34:16+5:302015-11-05T01:34:16+5:30
लोेकमत सखी मंच व एक्स्ट्रा शाईन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने केशवसूत मंदिराच्या प्रांगणात गरबा, दांडिया प्रशिक्षण नुकतेच

vब्रह्मपुरीच्या सखींनी घेतले दांडिया प्रशिक्षण
ब्रह्मपुरी : लोेकमत सखी मंच व एक्स्ट्रा शाईन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने केशवसूत मंदिराच्या प्रांगणात गरबा, दांडिया प्रशिक्षण नुकतेच पार पडले. प्रशिक्षिका आशिता रोकडे यांनी सखींना प्रशिक्षण दिले.
गरबा व दांडिया प्रतियोगिता वयोगट ४० मध्ये प्रथम क्रमांक विजया समर्थ, द्वितीय ममता यादव, वयोगट ३२ मध्ये प्रथम क्रमांक रोशनी विजय माने, द्वितीय कल्पना चिलमुलवार तर वयोगट १५ च्या खालील गटात प्रथम क्रमांक जिगिशा मेहर, द्वितीय धनश्री पिलारे व करिना वरलानी यांनी पटकाविला.
दांडिया प्रतियोगिता वयोगट ४० च्या वरमध्ये प्रथम क्रमांकाची जोडी तृप्ती बोकडे व लिमता झलके तर द्वितीय क्रमांकाची जोडी डॉ.मंगला दंदे व अर्चना तरेकर या जोडीने पटकाविला. वयोगट ३१ च्या खालीमध्ये प्रथम क्रमांकाची जोडी डॉ.वर्षा नाकाडे व डॉ. सरिता खोब्रागडे तर द्वितीय क्रमांक रुपा फेरवानी व कल्पना चिलमुलवार या जोडीने पटकविला. वयोगट १५ च्या खालीमध्ये प्रथम क्रमाकांची जोडी वैशाली गभने व रोशनी सहारे तर द्वितीय क्रमांक यश तंवर व अंकित देशपांडे या जोडीने पटकाविला. डॉ. तरल नागमोती यांनी वेशभूषा व नृत्य सादरीकरणात प्रथम क्रमांक पटकविला. बेस्ट फरफार्म्स म्हणून कोमल बुलबुले, बेस्ट मुव्हमेंट विभा चव्हाण यांना मिळाले.
संचालन नगरसेविका अर्चना खंडाते तर आभार संयोजिका शिला चरपटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजिका शीला चरपटे, सहसंयोजिका साधना केळझरकर, प्रीती कऱ्हाडे, अमिता बन्नोरे, मनीषा बगमारे, अल्का खोकले, स्नेहा गोसावी, प्रतिभा कसारे, स्वाती भजे, वंदना तायडे, संगीता राऊत, वंदना ढोमने आदींनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)