इरई (बोरगाव) रस्ता खडीकरणात वनखनिजांचा वापर

By Admin | Updated: August 22, 2015 01:31 IST2015-08-22T01:31:00+5:302015-08-22T01:31:36+5:30

तालुक्यातील इरईफाटा ते इरई (बोरगाव) या सुमारे चार चार किमी रस्त्याच्या खडीकरणात चक्क वन खनिजाचा सर्रास वापर सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.

Use of non-mineral waste in the road of Irai (Borgaon) | इरई (बोरगाव) रस्ता खडीकरणात वनखनिजांचा वापर

इरई (बोरगाव) रस्ता खडीकरणात वनखनिजांचा वापर

८० ब्रासचे उत्खनन : कवठाळा, वनरक्षकाचा प्रताप
कोरपना: तालुक्यातील इरईफाटा ते इरई (बोरगाव) या सुमारे चार चार किमी रस्त्याच्या खडीकरणात चक्क वन खनिजाचा सर्रास वापर सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या सदर रस्त्याच्या खडीकरणाचे काम चंद्रपूरच्या एका कंत्राटदाराने घेतले. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, अंदाजित २५ लक्ष रुपयाचे हे काम सदर कंत्राटदाराने ११ टक्के कमी (बिले) दरावर निविदेद्वारा प्राप्त केल्याचे समजते. दरम्यान, दोन महिन्यापासून हे काम सुरु आहे. या खडीकरणासाठी लागणारी ४० मि.मी. आकाराची गिट्टी आणि मुरूम या खनिजाची लगतच्या इरई (बोरगाव) येथील वनविभागाच्या कक्ष क्रमांक १९८ मधून खुलेआम अवैध उत्खनन केले जात आहे. ट्रॅक्टरद्वारा वाहतूक करुन सदर खनिज प्रस्तावित रस्त्याच्या कडेला ढिग करणे सुरु आहे. कवठाळा वनबिटाच्या वनरक्षकाशी कंत्राटदाराने कथितरित्या आर्थिक तडजोड करुन या उत्खननाचा सपाटा लावल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या खडीकरणाच्या कामात वापरण्यात येणारी सदर गिट्टी अत्यंत हलकी आणि निकृष्ट दर्जाची असल्याचे आढळून आले, तर मुरुमामध्येही मातीचे प्रमाण अधिक आहे. सध्या या रस्त्यावरील खड्डे याच मुरुमाने भरले असून या दोन दिवसाच्या पावसाने रस्त्यावर सर्वत्र चिखल झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर सदर रस्त्याचे खडीकरण कुचकामी ठरणारे असले तरी कमिशनच्या लोभापाई गडचांदूरचे साबांवि अभियंते याकडे कमालिचे दुर्लक्ष करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Use of non-mineral waste in the road of Irai (Borgaon)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.