उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा
By Admin | Updated: March 18, 2015 01:15 IST2015-03-18T01:15:37+5:302015-03-18T01:15:37+5:30
शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. त्यांनी व्यावसायिक शेती करण्याकडे लक्ष द्यावे. अपुरा पाऊस व सिंचनाची उपलब्धता याचे नियोजन करुन ...

उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा
बल्लारपूर: शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. त्यांनी व्यावसायिक शेती करण्याकडे लक्ष द्यावे. अपुरा पाऊस व सिंचनाची उपलब्धता याचे नियोजन करुन शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. हरिश गेडाम यांनी किन्ही येथे रविवारी आयोजित कृषी मेळाव्यात केले.
बल्लारपूर पंचायत समिती कृषी विभागाच्यावतीने शेतकरी प्रशिक्षण व कृषी मेळावा किन्ही येथील राजीव गांधी भवनात आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती चंद्रकला बोबाटे होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसभापती सुमन लोहे, किन्ही येथील सरपंच वासुदेव येरगुडे, उपसरपंच जीवनकला आलाम, कृषी मंडळ अधिकारी मारोतराव वरभे, संवर्ग विकास अधिकारी बी. बी, गजभे, कृषी अधिकारी नरेश ताजने, विस्तार अधिकारी मोल उघडे, सुधाकर खांडरे, आमडचे दादाजी वांढरे, ग्रामसेवक एकनाथ चाफले उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, आजघडीला शेतकऱ्यांना लहरी हवामानाचा सामना करावा लागत आहे. परिणामी खरीप व रबी हंगामावर अवकळा ओढवली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस यात भर टाकत आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज असून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी बी. बी.गजभे, एम. पी. वरभे, वासुदेव येरगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक कृषी अधिकारी नरेश ताजने यांनी केले. संचालन देवेंद्र डुंबरे यांनी तर आभार अमोल उघडे यांनी मानले. तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणातत उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)