शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दूषित भांडी वापरणाऱ्यावर मनपा कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:15 IST

डेंग्यू रोगावर प्रतिबंधासाठी मनपाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबतचा आढावा मनपा आयुक्त संजय काकडे यांनी चंद्र्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेतला.

ठळक मुद्देमनपा आयुक्त : डेंग्यू प्रतिबंधासाठी मनपाची जनजागृती मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डेंग्यू रोगावर प्रतिबंधासाठी मनपाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबतचा आढावा मनपा आयुक्त संजय काकडे यांनी चंद्र्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत घेतला. यावेळी डास अळी आढळणारी भांडी रिकामी न करणाऱ्या नागरिकांना मनपातर्फे नोटिस बजावावे, त्याद्वारे नमूद कार्यवाही न केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी याप्रसंगी दिले. यावेळी आवश्यक सूचनाही त्यांनी दिल्या.नगरसेवकांच्या सहकार्याने त्यांच्या वॉडार्तील पाणी साचलेल्या जागांवर मनपा स्वच्छता निरीक्षकांद्वारे गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत. शहरात धुरीकरण व औषध फवारणी सातत्याने करण्यात येत आहे. यासाठी प्राधान्याने शाळांमध्ये आणि रुग्णालयात जनजागृती करण्यात येत आहे. डेंग्यू व मलेरियाच्या डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी जनजागृतीपर पत्रकांचे वाटपही शहरात करण्यात आलेले आहे. एमपीडब्लू, एनएम व आशा वर्कर्समार्फत तापाचे रुग्ण शोधणे, रक्त नमुने घेणे व औषधोपचाराचे कार्य सुरु आहे. दूषित पाणी आढळल्यास आवश्यक तेथे अबेट, टेमिफॉस औषधी टाकण्यात येत आहे. तसेच आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र स्वच्छता, पाणीसाठ्याची तपासणी, फवारणी, धूरळणी मनपातर्फे सातत्याने करण्यात येत आहे. सद्यस्थितीत मनपाच्या तिनही झोन मिळून ७ स्वच्छता निरीक्षक आहेत. त्यांना प्रत्येकी चार स्वच्छता कर्मचारी देण्यात आलेले आहेत. ७ पोर्टेबल फॉगिंग मशीन, १ व्हेईकल माऊंटेड, फॉगिंग मशीन व फवारणी पंपांच्या मदतीने शहरात दररोज २८ कर्मचाऱ्यांमार्फत नियमित औषध फवारणी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी आयुक्तांनी विविध सुचना दिल्या.यावेळी अतिरिक्त आयुक्त बेहेरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आंबटकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अनिल कुकडापवार, डॉ. मन्सूर चिनी, डॉ. नितीन कापसे, डॉ. नरेंद्र जनबंधू आदी उपस्थित होते.डेंग्यू रुग्ण आढळल्यास मनपाला माहिती द्याडेंग्यू हा विषाणूजन्य व नोटीफायेबल आजार असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेला कळवावी, याबाबत आयमएच्या पदाधिकाºयांनी त्यांच्या सर्व सदस्य डॉक्टरांना सूचित करण्यास सूचना आयुक्तांनी आयमए सचिव डॉ. मन्सूर चिनी यांना दिल्या. त्याचप्रमाणे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात भेट देऊन याबाबत खात्री करावी व माहिती गोळा करण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्तांनी दिल्या.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू